…तेव्हा भाजपचे नगरसेवक मुंबईकरांची सेवा करत होते – आशिष शेलार

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते लोकांच्या सेवेत लागले होते. मात्र श्रेय घेण्यावरून त्यांच्यात खटके उडाल्याचे दिसूनही येत होते. अशातच प्रजा फाऊंडेशनकडून केल्या गेलेल्या सर्वेक्षणात कोविडच्या संकटकाळात भाजपच्या नगरसेवकांनी मुंबईकरांची सर्वात जास्त सेवा केल्याची माहिती पुढे आली आहे. आणि यावरूनच भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर (Shivsena) बोचरी टीका केली आहे.

कोविड काळात मुंबईकरांची सेवा भाजपा नगरसेवकांनीच करुन दाखवली…प्रजा फाऊंडेशनकडून शिक्का मोर्तब. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या भाजपा नगरसेवकांचे कौतूक! पण आम्हीच.. आमचीच..अशा वल्गना करणारे कुठे होते?

सत्ताधारी तेव्हा नातेवाईकांना टेंडर वाटत होते बहुतेक! अश्या शेलक्या शब्दात शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

ही बातमी पण वाचा : सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्येक्षात कृती करून दाखवावी – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER