त्यापेक्षा स्पर्धा न घेतलेल्याच बऱ्या – पेत्रा क्विटोव्हा

Petra Kvitova

कोरोनाच्या संकटावर मात करत पुन्हा टेनिसच्या स्पर्धा कशा सुरु करता येतील यासाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू आहे. यापैकी एक प्रेक्षकांशिवाय बंदिस्त स्टेडियममध्ये सामने खेळण्याचा आहे पण असे सामने खेळविण्यापेक्षा स्पर्धाच न घेतलेल्या बऱ्या असे दोन वेळची विम्बल्डन विजेती पेत्रा क्विटोव्हा हिने म्हटले आहे. त्यापेक्षा ग्रँड स्पर्धा घेऊच नका असे मत मांडत तिने रॉजर फेडररच्या मताशी सहमती व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे मार्चपासून टेनिसच्या सर्व स्पर्धा बंद आहेत आणि सामने पुन्हा कधी सुरू होतील ते अद्याप अनिश्चित आहे. मात्र प्रेक्षकांशिवाय काही प्रदर्शनी सामने खेळले जात आहेत. स्वतः पेत्रासुध्दा अशी एक स्पर्धा प्राग येथे खेळत आहे. मात्र ग्रँड स्लॅमसारख्या मोठ्या व प्रमुख स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळण्यात काहीच अर्थ नाही असे तिने म्हटले आहे. तसे असेल तर या स्पर्धा घेऊच नये असे स्पष्ट मत तिने मांडले आहे.

ही बातमी पण वाचा : टायसनशी लढणार टायसन!

माझ्या हाताशी वय आहे आणि ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळायची माझी इच्छासुध्दा आहे पण अशी स्थिती राहणार असेल तर त्या रद्दच कराव्यात. कारण टेनिसपटूसाठी ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळणे ही फार मोठी गोष्ट असते आणि त्यांच्यासाठी शक्तीचे व उत्साह वाढविण्याचे काम करणारे प्रेक्षकच नसतील तर ते योग्य नाही,असे पेत्राला वाटते.

याआधी रॉजर फेडररनेसुध्दा रिकाम्या स्टेडियम्समध्ये खेळायला विरोध दर्शविला आहे. प्रमुख स्पर्धा अशा पध्दतीने खेळणे अवघड आहे असे त्याचे मत असले तरी आयोजकांसमोर दुसरा पर्यायच नाही. टेनिसच्या स्पर्धांसाठी खेळाडूंना दर आठवड्याला लांबलांबचा प्रवास करावा लागतो त्यामुळे कोरोनानंतर टेनिस हा बहुधा सर्वात उशिरा सुरू होणारा खेळ असेल असे मानले जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER