…तर बाळासाहेब तुमच्या थोबाडीत नक्कीच मारतील, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

Maharashtra Today

कोल्हापूर : ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay raut) यांनी थोडं हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर येऊन शांतपणे बसावे, डोळे मिटावे आणि विचारावं माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)हे उत्तर देण्याऐवजी तुमच्या थोबाडीत मारतील’ अशी विखारी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडी सरकार, संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

‘संजय राऊत हे नेहमी काही ना काही विधाने करीत असतात. त्यांच्याबाबत कितीदा बोलावे याबद्दल मर्यादा आहे. उलट संजय राऊत यांनी थोडं हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर येऊन शांतपणे बसावे, डोळे मिटावे आणि विचारावं माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तर बाळासाहेब ठाकरे हे उत्तर देण्याऐवजी तुमच्या थोबाडीत मारतील’ असा सणसणीत टोला पाटील यांनी राऊतांना लगावला.

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे हे योग्य भूमिका घेत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच पेट्रोल डिझेल दर जागतिक बाजारपेठेत वाढलेली आहेत. इतर राज्यातील कर कमी आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीने इथला पेट्रोल डिझेल वरचा कर कमी करावा तर दर कमी होतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोरोनाच्या काळात आंदोलन करू नका रस्त्यावर उतरू नका अशी राज्य सरकारला पूरक भूमिका घेत असतील तर त्याला आमचा विरोध आहे. मुळात सर्वच काही सुरू आहे. बंद जरी सांगितला जात असला तरी सगळी दुकानं सुरूच आहे, असंही पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button