…तर १५ मेनंतर राज्यात कडक लॉकडाऊन; राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत

Rajesh Tope.jpg

मुंबई : राज्यातील कोरोना (Corona Virus) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारनं लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. मात्र १५ मेनंतर निर्बंध उठणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज ५० हजारांवर नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट अपेक्षेप्रमाणे कमी झालेला नाही.

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये दर कमी झाला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे निर्बंध काढून घेण्यात आले तर परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ शकते. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत १५ मेपर्यंत पुढील चित्र स्पष्ट होईल. जर रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर १५ मेनंतर राज्यात कडक लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना आखत आहे. बेड्स वाढवणं, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि इतर वैद्यकीय सुविधांमध्ये कशी वाढ करता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीनंही सरकार प्रयत्नशील आहे, असं टोपे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button