वडापाव अन् पाण्याच्या बाटल्या चोरल्या; गजा मारणेविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल

Commissioner Krishna Prakash

पिंपरी :- उर्से टोलनाक्यावर दुकानातून पैसे न देता पाण्याच्या बाटल्या व वडापाव जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी कुख्यात गुंड मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मारणेच्या गुंडांनी मिरवणूक काढून उर्से टोलनाक्यावर दहशत माजवली याबाबत गजा मारणे आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, हे उल्लेखनीय.

याबाबत माहिती देताना पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner Krishna Prakash) यांनी सांगितले, १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर गुंड गजानन मारणे याने मिरवणूक काढली. त्यात वाहनांचा मोठा ताफा होता. हा ताफा उर्से टोलनाक्यावर आला तिथे मारणे याच्या समर्थकांनी गोंधळ करून फटाके फोडले. ड्रोणने याचे चित्रीकरण करून दहशत माजवली. याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. इतर वाहनांना रोखून टोल न देता वाहने घेऊन गेलेत. टोलनाक्यावरील फुड मॉलमध्ये पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने नेलेत. त्यावरून गजा मारणेसह साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे, असे कृष्ण प्रकाश म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER