मुंबई-गोवा महामार्गावरील रिफ्लेक्टरची चोरी

रत्नागिरी(प्रतिनिधी):  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना सावधानतेच्या सूचना देणारे आणि मार्गदर्शकांची भूमिका बजावणारे रिफ्लेक्टर चोरीला जाण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महामार्गावरील लांजा तालुक्यातील वाकेड ते मठपर्यंतचे लावण्यात आलेले रिफ्लेक्टर चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. पावसाळा असल्याने महामार्गाचे काम ठप्प पडले आहे. यासह कोरोना लॉकडाऊनमुळे रात्रंदिवस महामार्गावर वाहनांची जास्त वर्दळ दिसून येत नाही. महामार्गावर वर्दळ नसल्याचा फायदा अज्ञात चोरटे करत आहेत. महामार्गावरील लांजा तालुक्यातील वाकेड ते मठ या दरम्यानचे रिफ्लेक्टर दिवसेंदिवस गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER