एक ऑक्टोबरनंतर सुरु होणार चित्रपटगृहे

theaters

अनलॉक 5.0 ची सुरुवात एक ऑक्टोबरपासून होणार असून त्यानतंर देशातील चित्रपटगृहे सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी चित्रपटगृह मालकांनी नियमावली तयार केली असून ती केंद्र सरकारडेही पाठवली आहे. यात अनेक नवीन नियमांचा समावेश करण्यात आलेला आहे. पाहूया काय आहे ही नियमावली.

मल्टीप्लेक्स आणि सिंगल चित्रपटगृह मालकांनी पेपरलेस तिकीट, प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझेशनची सोय, बसण्यासाठी एक आड एक सीट एवढेच नव्हे तर इंटरव्हलचा कालावधीही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच वेळी दोन शो आयोजित केल्याने गर्दी वाढू शकते हे लक्षात घेऊन मल्टीप्लेक्समध्ये एकाच वेळी दोन शो आयोजित न करण्याचाही निर्णय मल्टीप्लेक्स मालकांनी घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन केले जाणार आहे. तसेच प्रत्येक प्रेक्षकाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात येणार असून थर्मल स्कॅनिंगही केले जाणार आहे. चित्रपटगृहाची लॉबी, रेलिंग आणि दरवाजे सतत सॅनिटाईझ करण्याचा निर्णयही चित्रपटगृह मालकांनी घेतलेला आहे. आयनॉक्स आणि पीव्हीआरने ऑनलाईन तिकिट विक्रीच करण्याचे ठरवले आहे.

ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर अक्षय कुमारचा रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी आणि भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित रणवीर सिंह अभिनीत 83 चित्रपटगृहातच प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यानंतर सलमान खानचा राधेही प्रदर्शित केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER