झेब्य्राने सिंहाच्या जबड्यातून पिल्लाला सोडवले !

Zebra Lion Video

नवी दिल्‍ली :  वनाधिकारी सुशांत नंदा (Sushant Nanda) हे दुर्मिळ घटनांचे व्हिडीओ नेटवर टाकत असतात. झेब्य्राच्या पिल्लाला सिंहाच्या जबड्यातून सोडवतानाचा त्यांनी टाकलेला व्हिडीओ सध्या नेटवर व्हायरल होतो आहे. सिंह झेब्य्राच्या  पिल्लाची मान पकडतो. एक मोठा झेब्रा हे पाहून पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहावर धावून जातो. सिंहाला चावण्याचा प्रयत्न करतो.

यामुळे सिंह पिल्लाला सोडून देतो आणि झेब्य्रावर हल्ला करण्यासाठी वळतो; तोच झेब्रा सिंहाच्या तोंडावर लाथ मारतो. सिंह झेब्य्राचा नाद सोडून निघून जातो. यासंदर्भात उल्लेखनीय आहे की, झेब्य्राची  लाथ जबरदस्त प्रहार करते. त्याची  शिकार करणारे सर्व प्राणी त्याच्या लाथेपासून बचावून राहतात. काही दिवसांपूर्वी नंदा यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.  त्यात वाघ नदीतून पोहून जात होता. हा व्हिडीओ लोकांनी खूप पसंत केला आहे.

हा  व्हिडीओ  खूप दुर्लभ आहे. कारण वाघ साधारणपणे कमी पाण्यातच पोहतो. हा व्हिडीओ शेअर करीत सुशांत नंदा म्हणाले की, एक वाघ नागरहोले टायगर रिजर्व आणि बांदीपूर टायगर रिजर्व दरम्यान काबिनी नदी पार करीत आहे. वाघ खूप चांगलं पोहतो. मोठी नदीही सहजपणे पार करू शकतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER