लोकलच्या दारावर युवकाने डोके टेकवले! आनंद महिंद्राचे भावूक ट्विट

Mumbai Local - Anand Mahindra

मुंबई : सर्व मुंबईकरांसाठी मुंबईची लाईफलाईन लोकल १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. खूप दिवसांनी लोकलने प्रवास करणार म्हणून एका युवकाने लोकलच्या दारावर आपला डोके टेकवून डब्यात प्रवेश केला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा फोटो – ‘हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही’, अशी भावना व्यक्त करत ट्वीट केला.

आनंद महिंद्रांचं (Anand Mahindra) ट्वीट

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली नव्हती. आता १ फेब्रुवारीपासून राज्य सरकारने सर्वांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र, लोक पहिल्याप्रमाणे नाही पण, सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रवास करत आहेत. अशावेळी व्हायरल होणारा हा फोटो पाहून सर्वसामान्य मुंबईकर चांगलाच भावूक होताना दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवर भावनिक पोस्ट केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER