रेडीओ ठिक करणाऱ्या युवकानं केला तंत्रज्ञानात ‘हा’अविष्कार !

Radio - Maharastra Today

आसामच्या धेमाजी भागात राहणाऱ्या २७ वर्षीय नबजीत भराली नावाच्या युवकानं ‘तत्त्वज्ञान’ या विषयात पदवीउत्तर शिक्षण पुर्ण केलंय. शिक्षण पुर्ण केल्यानंतर तो ट्रन्सपोर्टेशन व्यवसायाकडं वळाले. या युवकाची इतकीच ओळख नाही. नबजीतनं खरी ओळख कमावली ती त्यानं लावलेल्या शोधामुळं त्याची भारतभर ओळख निर्माण झालीये. नबजीनं रेशिम उद्योसंबंधित लोकांसाठी ”सिल्क रिलिंग अँड स्पिनिंग मशिन’ बनवलीये. तसंच अपंगांसाठी त्यांनी ‘ऑपोमेटेड व्हिलचेअर’ बनवलीये. नबजीतला त्याच्या अविष्कारासाठी ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’कडून पुरस्कारही मिळालाय.

नबजीतला लहानपणांपासून मशिन्सचं आकर्षण होतं. त्याच्या मोठ्या भावाकडं बघत तो मोठा झाला. लहानपणी त्याच्या भाऊ खराब झालेले टीव्ही, रेडीओ इत्यादी इलेक्ट्रीकल गोष्टी रिपेअर करायचा. घरातच भावाचं छोटेखानी वर्कशॉप होतं. तिथूनच नबजीतचा भाऊ हे सर्व काम करायचा. लहान नबजीतला कोणत्याच गोष्टीला हात लावण्याची परवानगी नव्हती. तो फक्त लांबून भावाच काम करत होता. नंतर त्याच्या मोठा भाऊ सैन्यात भर्ती झाला. यानंतर घरातल्या वर्कशॉपचा ताबा नबजीतकडं आला. त्याला वर्कशॉपमधली प्रत्येक गोष्ट पहायची होती. मशीन्स उघडायच्या होत्या. दुरुस्त करायच्या होत्या. जोडायच्या होतात.

धीम्या गतीनं का होईना पण नबजीत मशिन्सची भाषा शिकला. भावाप्रमाणं खराब झालेल्या इलेक्ट्रीकल गोष्टी तो रिपेअर करु लागला. त्याच्या हाताला चांगल काम मिळू लागलं. त्याला आयुष्यभर इलेक्ट्रीशियन म्हणून रहायचं नव्हतं. यापेक्षा मोठं काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती.

सिल्क रिलिंग अँड स्पिनिंग मशिन

आसामच्या ज्या भागात ते राहतात तिथं मोठ्या प्रमाणात रेशिम उत्पादन केलं जातं. प्रत्येक घरात रेशिम उत्पादन घेण्यात येतं. त्यांच्या घरी देखील रेशिम बनवलंय जायंच. त्यांच्या आई तासंतास रेशिमचे धागे वेचायच्या. आईचं कष्ट हलकं करण्याचा त्यांनी विचार केला. त्यांनी असं यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळं रेशिम कमी मेहनतीत गोळा करता येईल. तेव्हा नबजीत सहावीत होते.

एका हातानं रेशिमचा धागा भरण्यासाठी आणि जवळपास एका तासाचा वेळ लागायचा. नबजीनं बनवलेलं यंत्र फक्त पाच मिनीटांमध्ये हे काम पुर्ण करतं. पहिल्यांदा मुंगा आणि नंतर एरी रेशिमसाठी वेगवेगळ्या मशिन्सचे प्रोटोटाइप बनवले होते. ज्यामुळं हे काम लवकरकर होणं शक्य होतं. बारावीपर्यंत दोन्ही तऱ्येह्चाय रिलिंग आणि स्पिनिंग मशिन्स त्यांनी बनवल्या होत्या. हा मशिन्स ऑटोमॅटीक होत्या आणि त्याच्या वापरातून रेशिम मिळवणं ही सोप्पी गोष्ट होती.

नबजीत यांनी मशिनवर तब्बल १२ वर्ष काम केलंय. बाजारात मिळणाऱ्या इतर यंत्रांपेक्षा नबजीतनं बनवलेली यंत्र जास्त प्रभावी आणि स्वस्त आहेत. यामुळं काम सोप्प झालंय. रेशिमचा धागा बनवायला आधी खुप वेळ खर्च व्हायचा पण यंत्रामुळं वेळ आणि उर्जा दोन्हींची बचत होते आहे. सुरुवातीच्या काळात २५- ३० लोकांनी ही मशिन नबजीत यांच्याकडून विकत घेतली. यामुळं नबजीत यांना भरपुर प्रोत्साहन मिळालं. त्यांनी या मशिनचं पेटंटही मिळवलंय. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनशी नबजीतचा यानंतर संपर्क आला.

नबजीत यांच्या यंत्रावर आय.आयटी. गुवाहटी आणि आय.आय.टी मणिपूरमध्ये काम सुरु आहे. नबजीतच्या यंत्राला अधिक अत्याधुनिक बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय.

ऑटोमॅटीक व्हिलचेअर

स्पिनिंग मशिनच्या यशस्वी प्रयोगानंतर ते ‘हनी बी नेटवर्क’च्या संपर्कात आले. त्यांना आणखी नवं काही तरी करायचं होतं. त्यांनी अपंगांसाठी व्हिलचेअर बनवण्याचा निर्णय घेतला. बाजारात एकेदिवशी बसून नबजीत काही विचार करत होते तेव्हा एक अपंग व्यक्ती रस्ता ओलांडानां त्यांना दिसला. एका लाकडी फळीला चाकं लावून तो हाताने गाडी सरकावत होता. नबजीत यांना त्याची ही अवस्था बघवली नाही. अपंगाला रोड क्रास करवून दिल्यानंतर ते घरी आले, आणि त्यांनी ऑटोमॅटीक व्हिलचेअर बनवण्याच्या कामाला सुरुवात केली.

व्हिलचेअर बनवायला फक्त पाच हजार रुपयांची सामग्री त्यांना लागली. त्यांनी तीन पायांची व्हिलचेअर बनवली. नंतर एन.एफ.आय.च्या सहय्यतेनं हे मॉडेल चार चाकांच्या व्हिलचेअरमध्ये त्यांनी बदललं. ती व्हिलचेअर ४० किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं चालते.

व्हिलचेअरसोबतच त्यांनी ‘स्मार्ट हँड ग्लव्ज’, ‘पॅडी थ्रेसर’ आणि ‘स्मार्ट अँटी लॉक’ अशी उपकरणं बनवलीयेत. जर कुणी चोरीचा प्रयत्न केला तर १०० मीटरपर्यंत याचा आवाज ऐकू जातो. नंतर त्यांनी व्हिलचेअरच पेटंट ही मिळवलं. व्हिलचेअर बनवण्यासाठी त्यांना ‘ग्रासरुट इनोव्हेशन अवॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांनी मोठ्या प्रमाणात इनोव्हेशनवर काम करण्याचा निर्णय घेतलाय ज्याद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांना पोहचता येईल.

ही बातमी पण वाचा : सुपारीचं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी उभारली देशातली तिसरी सर्वात मोठी चॉकलेट कंपनी !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button