तरूणास शिवीगाळ करून मारहाण

औरंगाबाद : तु आमच्या घराजवळ मुलींना आणू नको असे म्हटल्याने राग येऊन सय्यद राशेद माेबीन पिता सय्यद इलीयास अहेमद(३०, न्यु एसटी कॉलनी, कटकट गेट) यास आरोपी आयुब लाला, त्याचा पुतण्या, मुलगा व एका अनोळखी इसमाने (सर्व राहणार शहाबाजार) शिवीगाळ करून मारहाण केली. तर, अायुब लाला च्या मुलाने फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर फायटरने मारून त्याला जखमी केले. याप्रकरणाबाबत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फाैजदार सुपेकर करत आहेत.