योगी सरकारने राजकारण करणे थांबवून तिथल्या माता-भगिनींना सुरक्षा दिली पाहिजे; अमोल कोल्हेंनी सुनावले

Amol Kolhe - Yogi Adityanath

मुंबई : उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) कुणाचे सरकार आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे योगी सरकारने (Yogi Adityanath) कुणाच्या आड लपून राजकारण करणे थांबवून ज्या ठिकाणी आपले सरकार आहे, तिथल्या माता-भगिनींना सुरक्षित वातावरण दिले तर ते अधिक गरजेचे राहील, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी हाथरस (Hathras) घटनेवरून मुख्यमंत्री योगींना सुनावले आहे. त्यांनी हाथरस बलात्कारप्रकरणावर दु:ख व्यक्त केले आहे.

‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. ’ असं म्हणत कोल्हे यांनी निषेध केला आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कारप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. उत्तरप्रदेशात अयोध्येत एकीकडे रामाचे मंदिर बनत आहे तर दुसरीकडे रामाच्याच राज्यात माता-भगिनींवर असा अत्याचार होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही योगी सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेचा तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘हाथरसमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. कुठल्याही पक्षाचे सरकार असो अशा घटना घडायला नकोत. केंद्र सरकारने त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे.’ असे अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER