आखाड्यातला पैलवान गडी ‘असा’ बनला होता मुख्यमंत्री…

The wrestler in the arena had become the 'Chief Minister'

ऐंशी आणि नव्वदच ते दशक, उत्तर प्रदेशात ओबीसी राजकारण परमोच्च शिखरावर होतं. तसं पाहिलं तर स्वातंत्र्यानंतरच ओबीसींनी राजकीयदृष्ट्या हातपाय मारायला सुरुवात केली होती. एससी आणि एसटींना संविधानिक रित्या राजकीय स्थान मिळालं होतं. कालेलकर आयोग आणि मंडल कमिशननंतरही समाजात ओबीसी शिक्षण नव्हतं. पण ग्रामीण भागात ओबीसींचा दबदबा होता. जमिनी भरपूर होत्या. उत्पन्न चांगलं होतं फक्त नेतृत्व नव्हतं.

ओबीसींचा हे मागसलेपण सारण्यासाठी पुढं आला एका दुधव्यवसायवर गुजारण करणाऱ्या कुटुंबातला पैलवान. मुलायमसिंह नावाचा. कुस्ती आखाड्यात दंड ठोपटणारा मुलायम पुढ मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आसमान दाखवेल असं कोणालाही वाटलं नसेल. वयाच्या १५ व्या वर्षी समाजवादी विचारांनी प्रेरीत होवून १९५४ मध्ये उत्तर प्रदेशात शेतीसिंचनसाठी भरावी लागणारी रक्कम सरकारने वाढवली. त्यामुळे राम मनोहर लोहियांची प्रेरणा घेवून मुलायमसिंह ‘नहर रेट’ आंदोलनात सहभागी झाले. त्यात त्यांना तुरुंगावास झाला यात त्यांचा तत्कालीन दिग्गज नेत्यांशी त्यांचे संबंध प्रस्थापीत झाले. राजकारणाच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी मजूर, शेतकरी, विद्यार्थी, दलित व अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर आवाज उठवला.

कॉंग्रेसचे दिग्गज नेते अ‍ॅड लाखनसिंह यांचा पराभव करत मुलायमसिंहांनी विजय मिळवला. यानंतर मुलायमसिंह सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडूण आले.

मुख्यमंत्री मुलायमसिंह

सक्रीय राजकारणात उतल्यानंतर तब्बल २२ वर्षांनी मुलायमसिंह देशाच्या सर्वात मोठ्या राज्याचे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. पण हा मार्ग ही सुखकर नव्हता. राजीव गांधींचा (Rajiv Gandhi) पराभव करत व्हीपी सिंह प्रधानमंत्री बनले त्यांची इच्छा होती की चरणसिंहाचे पुत्र अजितसिंह यांनी युपीच मुख्यमंत्री बनाव, चरणसिंहाचा राजकीय वारसा अजितसिंहांना असला तरी जनाधाराचा वारसा मुलायमसिंहांना मिळाला होता आणि म्हणून जनता दलाने युपीत मुलायमसिंहांना मुख्यमंत्री बनवलं.

राजकारणात रमलेले मुलायमसिंहांचा अधिकचा वेळ लखनऊमध्ये जात त्यामुळे त्यांच्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांचे बंधू शिवपाल यादव यांचाकडे होती. वंशवादाच्या विरोधात भूमिका घेत लोहिया आंदोलनाशी जोडले गेलेले मुलायमसिंह स्वतःच युपीत घराणेशाहीचा पाया जाणत्या अजाणत्यापणे मजबूत करत होते.

समाजवादी पार्टीचा जन्म

चंद्र शेखरांच्या जनता दलाच्या ताकदीवर मुख्यमंत्री बनलेल्या मुलायम सिंहांसमोर सर्वात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला तो  म्हणजे १९९० मध्ये आयोद्ध्येत बाबरी मशिदीचा विध्वंस करणासाठी एकत्र जमलेल्या कारसेवकांवर झालेल्या गोळीबारामुळं. त्यात त्यांना प्रचंड टीकेला सामोर जावं लागलं. मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागल. स्वतःच्या विचारांचा स्वतःचा पक्ष असावा या विचारानी त्यांनी समाजवादी पार्टीची निर्मीती केली. पण तेव्हा मुलायमसिंहांच्या पार्टीकडे जनाधार नव्हता. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर मात्र त्यांचा हा विचार योग्य ठरला बहूजन समाजवादी पार्टी सोबत आघाडी करत लढलेल्या १९९३ च्या निवडणूकीत २५६ पैकी १०९ जागांवर सपा तर १६४ पैकी ६७ जागांवर बसप निवडून आली. आणि कॉंग्रेसच्या समर्थनावर सरकार बनवतं मुलायम सिंह मुख्यमंत्री झाले पण हे सरकार जास्त काळ टिकलं नाही अवघ्या दोनच वर्षात १९९५ ला बसपने समर्थ परत घेतल्याने मुलायम सिंहाना राजीनामा द्यावा लागला.

केंद्राच्या राजकारणात मुलायमसिंह

युपीत सरकार पडल्याने मुलायम सिंहांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला. १९९६ मध्ये मैनपुरी लोकसभा मतदार संघातून निवडणू आले. केंद्राय युपीएची सरकार बनली तेव्हा ते रक्षामंत्री  होते. हे सरकार ही जास्त दिवस टिकलं नाही.

२००३मध्ये मुलायमसिंह पुन्हा युपीत परतले आणि २००७ पर्यंत मुख्यमंत्री होते. २०१२ ला युपीत सपाची सत्ता आल्यानतंर त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांना युपीच्या गादीवर बसवलं.

यानंतर २०१४ लोकसभा निवडणूकीत ते मैनपूरी आणि आजमगढ दोन्ही  मतदारसंघातून निवडून आले. मैनपूरी मतदार संघातून त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांचे नातू तेजप्रताप सिंह या मतदार संघातून पुन्हा निवडणून आले.

यादव घराण्यातली यादवी

मुलायमसिंहांच्या सुरुवातीच्या राजकारणात शिवपाल यादवांच मोठे योगदान होत. अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टीत वाढता दबदबा आणि पक्षात अखिलेश यादावांची एकाधिकारशाही याला विरोध करत शिवपाल यादवांनी वेगळी चुल मांडली. यामुळे २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत अखिलेश यादवांना सत्तेवर पाणी सोडावे लागले.

शिवपाल यादवांनी प्रगतीशील समाजवादी पार्टीची स्थापना केली २०१९ च्या लोकसभा निवडणूक ही लढवली पण  जनाधारमिळवता आला नाही.

लोहियांच्या विचारांनी प्रेरीत होवून घराणेशाही विरुद्ध दंड थोपटणाऱ्या मुलायमसिंहांनी युपीत यदुवंशाचा पाया रचला. अनेक वादळांना तोंड देत मुलायमसिंह उभे आहेत. येत्या काळात कौटुंबीक आणि राजकीय पेचप्रसंगातून कसा मार्ग काढतात. हा येणारा काळच ठरवेल.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER