जगातल्या सर्वांत जुन्या व्हिस्कीच्या बाटलीचा जूनमध्ये होणार लिलाव

OLD Wishky Bottel - Maharashtra Today

जगातल्या सर्वांत जुन्या व्हिस्कीच्या बाटलीचा लिलाव जून २०२१ मध्ये अमेरिकेच्या मॅसेच्युएसेट्स प्रांताची राजधानी बोस्टनमध्ये होणार आहे. या बाटलीसाठी ४० हजार डॉलर्सपर्यंतची बोली लागू शकते असा अंदाज आहे. ही व्हिस्की इसवी सन १७६२ ते १८०२ दरम्यान जॉर्जियाच्या लाग्रांजमध्ये तयार करण्यात आली आहे, असा दावा या बाटलीचा लिलाव करणाऱ्या स्किनर ऑक्शनिअर्सन कंपनीने केला आहे.

१८६० मध्ये इव्हान्स अँड रॅग्लँड यांच्यातर्फे जीए लाग्रांजमध्ये तयार करण्यात आलेली ‘ओल्ड इंग्लल्ड्यू व्हिस्की’ची ही बाटली सर्वांत जुन्या व्हिस्कीची अस्तित्वात असलेली एकमेव बाटली मानली जाते. १९४० च्या दशकात जेपी मॉर्गनच्या तळघरात असलेली ही बाटली वॉशिंग्टन पॉवर एलिटला (वॉशिंग्टन सर्वोच्च व्यक्तीला) भेट देण्यात आली होती, अशी माहिती ‘स्किनर’चे रेअर स्पिरिट्स तज्ज्ञ जोसेफ हायमन यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेल्या कंपनीच्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

जॉर्जिया विद्यापीठाच्या सहकार्याने २०२१ मध्ये करण्यात आलेल्या ‘कार्बन १४ डेटिंग’नुसार या व्हिस्कीची निर्मिती १७६२ ते १८०२ दरम्यान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर ग्लासगो युनिव्हर्सिटीने या बाबतीतल्या माहितीचे मूल्यांकन करून ही व्हिस्कीची बाटली १७६३ ते १८०३ दरम्यान तयार करण्यात आल्याचा ८१ टक्के अंदाज वर्तवला आहे. यामुळे या बाटलीला १७७० ची क्रांतिकारी लढाई आणि १७९० चा व्हिस्कीच्या विश्वातील बंडखोरीचा ऐतिहासिक संदर्भ आहे, असे ‘स्किनर’ कंपनीने म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये आयोजित १०० वर्षांपूर्वीच्या व्हिस्की संग्रहाच्या लिलावात व्हिस्कीच्या एका बाटलीला सुमारे १० लाख डॉलर्स म्हणजे ७ कोटी रुपये मिळाले होते. दुर्मीळ व्हिस्कीच्या बाटलीला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे. मॅकलन डिस्टिलरी कंपनीनं १९२६ मध्ये म्हणजे जवळपास १०० वर्षांपूर्वी बनलेली ही व्हिस्की जगातील सर्वांत दुर्मीळ अशा १४ दारूंच्या प्रकारांपैकी एक आहे. ३९०० सिंगल माल्टसच्या संग्रहाला तब्बल ६.७ दशलक्ष डॉलर्स किंमत मिळाली. एका खासगी संग्रहाला प्रथमच अशी सहा आकडी किंमत मिळाली होती. आता त्याहून अधिक जुन्या व्हिस्कीच्या बाटलीच्या लिलावाकडे सगळ्या मद्य जगताचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button