नासात मोठे प्रकल्प हाताळणारी ‘भारतीय’ तरुणी आता इलॉन मस्क सोबत उभारतीये जगातील वेगवान ट्रेन !

Maharashtra Today

भारतीय वैज्ञानिकांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर जगभरात आपली ओळख निर्माण केली. होमी भाभांनी भारताला परमाणू शक्तीनं संपन्न केलं. तर दुसऱ्या बाजूला गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी गणित क्षेत्रात जगभरात नावाचा डंका वाजवला होता. अनेक शतकांपासून भारतीयांनी विद्वत्तेचा परिचय जगाला करवून दिलाय.

याच पंरपरेला पुढं नेण्याचं काम करतायेत डॉ अनिता सेनगुप्ता. त्या एक एअरोस्पेस इंजिनिअर आहेत. नासामध्ये कामाचा अनूभव असणाऱ्या डॉ. अनिता यांच्यावर अमेरिकेतल्या ‘हायपरलूप’चं स्वप्न सत्यात उतरवण्याच काम करत आहेत.

नऊ वर्षांपासून सुरुये काम

नासानं गेल्या काही वर्षांपासून केलेल्या प्रयोगांमध्ये डॉ. अनिता सेनगुप्ता (Anita Sengupta) यांची प्रमुख भूमिका होती. ज्यात त्यांनी ब्रम्हांडातल्या सर्वात मोठ्या थंड ठिकाणाचा शोध लावण्यात त्यांच मोठं योगदान आहे. टेस्ला कंपनीचे सहसंस्थापक ‘इलॉन मस्क’ (Elon Musk)यांचा बहूचर्चित प्रोजेक्ट ‘वर्जिन हायपरपू वन’ मध्ये सिनिअर वाइस प्रेसिंडेंट म्हणून काम सांभाळत आहेत (Indian’ girl who handled big projects at NASA).

त्यांच्यावर प्रोडक्ट प्लॅन, इंजिनिअरींग, डेव्हलमेंट अँड सेफ्टी, मिशन एश्योरेंस आणि एक वेगळ्या प्रकारच्या हाय स्पीड ट्रान्सपोर्ट सिस्टीम निर्मितीची जबाबदारी आहे. यात प्रवास करण्याच्या पद्धतीत क्रांतीकारी बदल करण्यात आलाय. या आधी जून २००८ पासून नासाच्या ‘जेट प्रोप्यूलेशन लॅबोरेट्रीत’ त्या महत्त्वाच्या पदावर होत्या.

डॉ. अनिता यांच्या करिअची सुरुवात बोईंग स्पेस अँड कम्यूनिकेशन्समध्ये इंजिनिअर म्हणून झाली. प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच मोठी पदं मिळवली. तिथं त्या सिनिअर इंजिनिअर, टास्क मॅनेजर ते सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर ही महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली आहेत. यानंतर त्यांनी नासाच्या स्टाफ एअरोस्पेस इंजिनिअर या पदावर रुजु होत नासामध्ये सेवा द्यायला सुरुवात केली. नासामध्ये आयुष्यातला मोठा काळ त्यांनी सेवा दिली. सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी हायपर लूप वन प्रोजक्ट जॉइन केला.

अमेरिकेत डॉ. अनिता यांनी शिक्षण पुर्ण केलं. त्यांचे वडील पश्चिम बंगालचे आहेत. हायपर लूप प्रोजक्टमध्ये काम करणाऱ्या डॉ. अनितांनी ‘सुपर सोनिक पॅरेशुट सिस्टम’ बनवणाऱ्या टीम सोबत काम केलंय. या सिस्टमचा उपयोग मंगळ ग्रहावर नासानं पाठवलेल्या ‘क्युरिओसिटी रोव्हर’ मध्ये करण्यात आलाय.

अमेरिकेच्या वाळवंटात सुरुये हायपर लूपची चाचणी

हायपरलूप एका प्रकारची मोठी व्हॅक्यूम ट्यूब असते. चुंबकाच्या सह्याने चालणाऱ्या ट्रेनचा एक प्रकार असं हायपरलूपला म्हणता येईल. या कामासाठी डॉ. अनिता यांच्या टीममध्ये ३०० इंजिनिअर आणि कर्माचऱ्यांची टीम काम करते आहे. ३७८ किलोमीटर प्रतितासाच्या वेगात याची चाचण हायपरलूपची चाचणी करण्यात आली होती. हा वेग तीनपट वाढू शकतो. म्हणजे जवळपास ११०० किलोमीटर प्रतितास प्रयोग करणं हायपरलूपमुळं शक्य होणार आहे.

अमेरिकेच्या हायपरलूप प्रोजेक्टमध्ये(Hyperloop Project) भारतीय महिलेचा सहभाग अभिमानाची गोष्ट आहे. याच धर्तीवर पुणे ते मुंबई हायपरलूप प्रोजेक्ट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी हाती घेतला होता. हा देशातला पहिला हायपर लूप प्रोजेक्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button