कसोटी क्रिकेटमधील ५ सर्वात हळू डावांचा जागतिक विक्रम आहे “या” फलंदाजांच्या नावावर

Sports

कसोटीला क्रिकेटला रिअल क्रिकेट म्हंटले जाते, कारण कोणत्याही खेळाडूला बर्‍याच काळासाठी या स्वरूपात टिकून राहणे सोपे नाही.

कसोटी क्रिकेटला क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांपैकी सर्वात अवघड मानले जाते, कारण येथे यश मिळविण्यासाठी खेळाडूला केवळ चांगल्या तंत्राचीच गरज नसते तर संयमाचीही आवश्यकता असते, म्हणूनच कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या दिग्गजांनीही पराभव स्वीकारला आहे. असे असूनही कसोटी क्रिकेटच्या जगात असे अनेक महारथी झाले आहेत ज्यांनी या स्वरूपात अनेक उत्कृष्ट विक्रम नोंदवले आहेत. तसेच काहीवेळा कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंना विकेट वाचवण्यासाठी खूप हळू डाव खेळावा लागतो, ज्यामुळे नाहीच्या बरोबरीत धावा होतात. म्हणूनच आजच्या या कथेत आम्ही तुम्हाला कसोटी क्रिकेटमधील ५ सर्वात हळूवार डावांबद्दल सांगणार आहोत.

#१. एबी डिविलियर्स (AB de Villiers)
दक्षिण आफ्रिकेचा धुवाधार फलंदाज एबी डिविलियर्सने सन २०१५ मध्ये भारत विरुद्ध दिल्ली कसोटी सामन्यात २४४ चेंडूंत अवघ्या २५ धावा केल्या होत्या. त्यावेळी हाशिम आमलादेखील डिविलियर्ससमवेत क्रीजवर होता. त्यावेळी डिविलियर्सचा स्ट्राइक रेट फक्त १० होता.

#२. राहुल द्रविड (Rahul Dravid)
राहुल द्रविडला कसोटीचा मास्टर मानला जाताता. २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध द्रविडने ९६ चेंडूत फक्त १२ धावा केले होते. तथापि नंतर ही कसोटी अनिर्णीत राहिली. पण द्रविडच्या या खेळीची गणना कसोटी क्रिकेटमधील सर्वात हळू-हळू खेळीमध्ये केली जाते.

#३. हनीफ मोहम्मद (Hanif Mohammad)
१९५४ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या हनिफ मोहम्मदने २२३ चेंडूंत २० धावा केले होते. त्यावेळी हनिफचा स्ट्राइक रेट ९ होता. तसेच या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला होता.

#४. ज्योफ एलॉट (Geoff Allot)
या यादीमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या ज्योफ एलॉटचेही नाव आहे. १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एलॉटने ७६ चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव करता आले नाही. शेवटी जैक कैलिसच्या चेंडूवर ज्योफ एलॉट आऊट झाला.

#५. यशपाल शर्मा (Yashpal Sharma)
भारताच्या यशपाल शर्माने १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५७ चेंडूत १३ धावा केल्या होत्या तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट ८ होता. मात्र यशपालच्या या खेळीमुळे टीम इंडियाला तो सामना ड्रॉ करता आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER