‘ठाकरे ब्रँड’ कोण जपते, हे जगाला माहीत आहे; शालिनी ठाकरे यांचे राऊतांना उत्तर

Sanjay Raut - Shalini Thackeray

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘ठाकरे ब्रँड’ची (Thackeray Brand) चर्चा केली. त्यातून उद्धव ठाकरे यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी व्हीडीओतून बाळासाहेब (Balasaheb Thackeray) आणि राज (Raj Thackeray) यांच्यातील साम्यस्थळे दाखवताना राऊतांना टोमणा मारला, ‘ठाकरे ब्रँड’ कोण जपते, हे जगाला माहीत आहे.

संजय राऊत यांनी रविवारी ‘रोखठोकमधून’मधून ‘ठाकरे ब्रँड’ची चर्चा केली. महाराष्ट्रासाठी हा ब्रँड महत्त्वाचा आहे. राज ठाकरे हे सुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल’ अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली होती.

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी एका व्हीडीओतून राऊतांना उत्तर दिले. ‘ठाकरे ब्रँड’ कोण जपते आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे असे म्हटले.

शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर हा व्हीडीओपोस्ट केला आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातली साम्यस्थले दाखवली व त्यातून राज ठाकरे हेच बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत असे सूचित केले. व्यंगचित्रकार, गर्दी खेचणारा नेता आणि प्राण्यांवर प्रेम हे बाळासाहेब आणि राज ठाकरे या दोघांमध्येही आहे असे दाखवले.

राऊत म्हणाले होते – ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून हे ब्रॅण्डच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER