जगात आता अणुबाँब नाहीतर जैवीक हत्त्यारांची दहशत वाढतीये!

Maharashtra Today

मागच्या वर्षी कोरोना(Corona) उद्रेक झाला. अनेक देशांनी ही चीनची चाल असल्याचं सांगितलं. कोरोनासारख्या विषाणूंचा वापर जैवीक हत्यार म्हणून केला जात असल्याचे ही तर्क देण्यात आले होते. युद्धात शत्रु राष्ट्राला अपाय करण्यासाठी वापल्या जाणाऱ्या हत्यारांसारखीच जैवीक हत्यारं जीवघेणी असतात. जैवीक हत्यारं कशी बनतात. त्यांच्या निर्मितीचा इतिहास आणि प्रयोग करण्याच्या पद्धती याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.

असा होतो जैवीक हत्यारांचा प्रयोग

जैविक हत्यारं वापरण्याच्या अनेक पद्धती आहेत. एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून इतर व्यक्तींमध्ये जैविक हत्याराचा प्रसार करणं शक्य आहे. जीवाणूंवर प्रयोग प्रक्रिया करुन जैवीक हत्यारं बनवली जातात. जीवाणू, पिकं आणि प्राण्यांमध्ये याचे संक्रमण करनं सोप्प असतं. या प्रयोगात काही मुलभूत विधींना ध्यानात घेतलं पाहिजे. जेवण किंवा पाणी यांच्या माध्यमातून जैवीक विषाणूचा प्रसार केला जातो. बहुतांश जैवीक विषाणूंचा प्रसार करण्यासाठी बॅक्टेरिया, किटे किंवा विषाणूंचा वापर केला जातो. यापैकी सर्वात खरतना जीवाणू म्हणून ‘एंथ्रेक्स जीवाणू’ला ओळखलं जातं.

हा विषाणू प्लेगसाठी कारणीभूत ठरतो, जंगलातल्या वणव्या प्रमाणं एखादं खेड असो की मोठं शहर उध्वस्त करण्याची ताकद या जीवाणूत आहे. म्हणून जगभराच्या इतिहासत वेगवेगळ्या काळखंडात याच्या वापराच्या घटना इतिहासात नोंदवल्यात. विषाणू आणि जिवाणूंसोबत प्रोटोजोआ आणि कवक यांचा उपयोग सुद्धा जैवीक हत्यार म्हणून केला जातो. या प्रमुख वापर पीकं नष्ट करण्यासाठी केला जातो. शत्रुची खान्याची तारांबळ उडावी. जेवायला खायला न मिळाल्यामुळं शत्रु सैन्य कमजोर पडावं या युक्तीनं याचा वापर केला जातो.

शेकडो वर्षांपासून सुरुये जैवीक हत्यारांचा उपयोग

विज्ञानाचा विकास हा माणसं मारण्याच्या पद्धतीचा विकास असल्याचं मत बऱ्याच समाजशास्त्रींनी मांडलंय. पण विज्ञानाच्या बऱ्याच आधीपासून जैवीक हत्यारांचा उपयोग सुरुये. याचे पुरावे तब्बल ७०० वर्षांपूर्वी मिळतात. युरोप जिंकण्यासाठी मंगोलांनी १३४६ साली सर्वात आधी जैवीक हत्यारं वापरलं. प्लेगच्या साथीनं मेलेल्यांचे मृतदेहांना शहराला पाणी पुरवणाऱ्या पाणवठ्यात टाकलं. जेव्हा शहरवासीयांनी प्लेग संक्रमीत पाणी पिलं त्यामुळं हजारो लोक मृत्यूमुखी पडले. प्लेगच्या विषाणूला हत्यार म्हणून वापरायची परंपराच सुरु झाली.नंतर दुसऱ्या महायुद्धात जपाननं जवळपास दिड कोटी प्लेगचे विषाणू चीनमध्ये सोडले होते. याशिवाय रशिया आणि अमेरिका एकमेकांविरुद्ध या विषाणूचा वापर करण्याच्या विचारात होते.

प्लेगच्या विषाणूनंतर चेचक नावच्या विषाणूचादेखील वापर जैवीक हत्यार म्हणून करण्यात आलं. अठराव्या शतकाच्या मध्यात अमेरिकेने ब्रिटनविरुद्ध याचा वापर केला होता. जैवीक हत्यारांबाबतीत सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब ही आहे की याचा वापर करणारा विषाणूंना नियंत्रित करु शकत नाही. जैवीक हत्यार बनू नयेत म्हणून अनेक आंतराराष्ट्रीय संघटनांनी कायदे बनलेत.

येत्या काळा वापर वाढण्याची शक्यता

माणसांवर होणाऱ्या जैवीक हत्यारांच्या हल्ल्याशी प्रतिकार करता यावा म्हणून अनेक संघटना काम करतायेत. जैवीक हत्यारांच्या माऱ्यानंतर एखादा व्यक्ती किती वेळात रुग्णालयात पोहचतो हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. वेळेत आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास जीव वाचू शकतो. येत्या काळात जैवीक हत्यारांचा वापर वाढणार असल्याची चिन्ह आहेत. याचा वापर मानवाच्या उन्नतीसाठी होईल की विध्वंसासाठी हे ठरवणं महत्तवाच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button