
प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रिया असणार्या एसटी बसस्थानकांचे काम निधीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली व सिरोंचा बसस्थानकांच्या कामांच्या अनुषंगाने अनिल परब (Anil Parab) बोलत होते.
अहेरी येथील बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. कोरोना कालावधीत राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. रेतीघाट बंद असल्यामुळे रेतीअभावी आलापल्ली व सिरोंचा येथील बसस्थानकांची कामे प्रलंबित आहेत. अर्थसंकल्पामध्ये बसस्थानकांच्या कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली. निधी उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरवून बसस्थानकांची कामे पूर्ण केली जातील.
नवीन बसस्थानकांच्या कामांसाठी बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर काम हाती घेण्यात येईल. बीओटी शक्य होणार नाही तिथे बसस्थानकांची कामे एसटी महामंडळामार्फत केली जाईल, असेही परब म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला