जावई शब्द काँग्रेसला झोंबला !

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली : राज्यसभेत ‘मुद्रा योजने’वर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले. यात काँग्रेसचाही समावेश होता. या प्रश्नाला उत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)यांनी ‘जावई’ (Jawai)असा उल्लेख केल्याने काँग्रेसचे सदस्य संतापले!

झाले असे, सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर टीका केली. मुद्रा योजनेअंतर्गत २७ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची कर्ज देण्यात आली, अशी माहिती दिल्यानंतर काँग्रेसला डिवचण्यासाठी त्या म्हणालात – ही कर्ज कोणी घेतली, जावयाने?

सीतारामन यांच्या टोमण्याने काँग्रेसवाले संतापले. त्यांनी सीतारामन यांच्या विरोध केला. त्यावर काँग्रेसची आणखी फिरकी घेताना सीतारामन म्हणालात, जावई हा शब्द काँग्रेसचा ‘ट्रेडमार्क’ नाही. जावई प्रत्येक घरात असतो परंतु काँग्रेससाठी जावई हे विशेषनाम आहे.

सीतारामन यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनसंदर्भातील प्रश्नालाही उत्तर दिले. ऑगस्ट २०१६ ते जानेवारी २०२० पर्यंत युपीआयने एकूण ३.६ लाख कोटी रूपयांचे ट्रान्झॅक्शन झाले आहे. युपीआयचा वापर श्रीमंत व्यक्ती करत नाहीत, मध्यमवर्गीय व्यक्ती आणि छोटे व्यापारी करतात. हे लोक कोण आहेत. सरकारने कोणाच्या जावयासाठी युपीआय तयार केले नाही.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, प्रियंका गांधी यांचे पती व सोनिया आणि राहुल गांधी यांचे जावई राबर्ट वॉड्रा यांच्यावर जमिनींच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत, त्यामुळे जावई या शब्दाचा घोटाळ्याशी जोडलेला संबंध काँग्रेसला झोंबतो!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER