‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो; आव्हाडांचा फडणवीसांना टोला

Jitendra Awhad - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई :- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कोणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर २४ तासांची निवडणूक प्रचारबंदी लावण्यात आली आहे. यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप नेहमीच मतांचे ध्रुवीकरण करत आला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नोकरदार महिलांसाठी वसतिगृह; सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची मागणी

मुंबईतील वर्किंग वुमन्ससाठी  हॉस्टेल उभे करण्याची विनंती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटरद्वारे केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत जितेंद्र आव्हाड यांना सूचना केली होती. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार हे वसतिगृह उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. “ताडदेव येथे एक हजार नोकरदार महिलांची राहण्याची व्यवस्था होईल, असे सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येत आहे. नोकरदार महिलांसाठीच हे वसतिगृह असणार आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत  हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहासाठी ३५ कोटी खर्च येणार असून सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे हॉस्टेल असणार आहे.” असे आव्हाड म्हणाले. तीन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पूर्तता केली आहे.

म्हाडा जबाबदारी घेणार; १०० फ्लॅट्स  टाटा कॅन्सर हॉस्पिटलला

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले १००  फ्लॅट्स   टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय २५ मार्च रोजी घेतला आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. लोकांना वाचवण्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी जे जे हवे ते ते करू, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button