महिलेने मोडला विश्वविक्रम ! जुळी, तिळी नव्हे, तब्बल १० मुलांना दिला जन्म

Gosiami Dhamara Sithole

केपटाऊन : आजवर तुम्ही जुळी किंवा तिळी जन्मल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही असा प्रकार दक्षिण आफ्रिकेमध्ये घडला आहे. एखाद्या महिलेने एकाच वेळी १० बालकांना जन्म दिल्याचा प्रकार दक्षिण अफ्रिकेत घडला आहे. हा एक विश्वविक्रम असल्याचे सांगितले जात आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. गोसियामी धमारा सिटहोल गर्भवती असताना त्यांना सहा मुलं होऊ शकतात, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. पण या महिलेच्या पोटात ७ जून रोजी फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिल्यामुळे डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे.

याबाबत गोसियामीने सांगितले, आम्हाला आठ बाळे होतील, असा अंदाज माझ्या पतीने व्यक्त केला होता. या सर्व बालकांचे स्वास्थ्य चांगले असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button