महिलेवर हल्ला करून स्वतः आत्महत्या केली

रत्नागिरी/प्रतिनिधी :- महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने स्वतः त्या महिलेच्या घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रत्नागिरी शहरातील बंदररोड येथे घडली.

महेश पाडावे याने छाया चंद्रशेखर चव्हाण (40) धारदार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर महेश पाडावे याने स्वतः छाया चव्हाण यांच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. छाया चव्हाण धडपडत घराबाहेर पडल्या. त्यानंतर तेथील एका मुलाने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या सर्व प्रकरणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रत्नागिरी पोलीस कसून चौकशी करत आहेत. छाया चव्हाण आणि महेश पाडावे हे दोघेही फिशरीज महाविद्यालयामध्ये लिपिक पदावर काम करत होते.

ही बातमी पण वाचा : ईस्लापुर: कार अपघातात एक ठार, तीन जखमी