चपाती आंदोलनामुळं संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता!

Maharashtra Today

१८५७च्या उठावानं व्यापक चित्रण आपल्या इतिहासकारांनी करुन ठेवलंय. त्याच्या तुलनेत ऐतहासिक ‘चपाती’ आंदोलनाला म्हणावंस महत्त्व द्यावं असं इतिहासकारांना का वाटलं नाही? असा सवाल आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. शब्दशः या आंदोलनाचा अर्थबोध आपल्याला उपाशी माणसाच्या ताटात रोटी वाटण्याची मोहीम असा करता येईल. परंतू याचा अर्थ आणि हे आंदोलन याहून बरच वेगळं होतं. काय होतं हे ऐतहासिक आंदोलन? असा सवाल आजही अनेकांना आजही पडतो.

आंदोलनाचा एकमेवर पुरावा होतं ते पत्र

१८५७ चा उठावबद्दल ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीतील आरोग्य सैन्याधिकारी ‘डॉ. गिल्बर्ड हॅडो’ यांनी पहिल्यांदा याचा उल्लेख करत स्वतःच्या बहिणीला पत्र लिहलं होतं, या पत्रात त्यांनी ऐतहासिक ‘चपाती आंदोलन'(Chapati movement) या विषयावर लिहलं होतं “भारतात एक रहस्यमी आंदोलन सुरु आहे. ते आंदोलन काय आहे? याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाहीये. काही जणांना हे धार्मिक आंदोलन वाटतं तर काही जणांना गुप्त समाजाचं षडयंत्र वाटतं. कुणाला काहीच माहिती नाही. फक्त इतकच माहिती आहे की या आंदोलनाला ‘चपाती आंदोलन म्हणलं जातं. ‘” हॅडो यांनी पत्रात उल्लेख केलेली घटना काही किरकोळ सामान्य घटना नव्हती. ते एक असं आंदोलन होतं ज्यामुळं इंग्रजांची झोप उडाली होती.

९० हजार पोलिस कर्माचारी आंदोलनात सामील झाले होते

ब्रिटीशांच्या सेवेतील ९० हजार पोलिस कर्मचारी एका गावाहून दुसऱ्या गावात चपत्या भरलेली पोती पोहचवत होते. या चपात्या पोहचल्यानंतर त्या एका गावातून दुसऱ्या गावात पोहचवल्या जाव्यात असा संदेश त्यातून देण्यात यायचा. प्रत्येक गावा गावात चपात्या पोहचायच्या आणि या सोबतच एक संदेशही तिथं पोहचायचा. क्रांतीचा आणि बंडखोरीचा. ब्रिटीशांहून अधिक तिव्र गतीने संदेश पोहचवण्याची ताकद या चपाती आंदोलनाला होती.

तात्या टोपेंनी सुरु केलं होतं आंदोलन

बहूतांश इतिहासकार मानतात की हे आंदोलन तात्या टोपेंनी सुरु केलं होतं. १९५० च्या आसपास. यामुळंच १८५७च्या उठावाचा भडका उडाला. चपाती आंदोलनात कुणाकडेच हत्यार नव्हती. संदेश वहनाची प्रभावी साधनं नव्हती. तात्या टोपे कमालीचे रणनितीकार होते. त्यांनी बनवलेल्या योजना भल्या भल्या विद्वानांना मात द्यायच्या. तात्या टोपेंनी आखलेली ही रणनिती सफल झाली आणि संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहेच. परंतू देशातल्या पहिल्या स्वातंत्र्यता आंदोलनाला बळ देण्याचं काम चपाती आंदोलनानं केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button