अंबानींच्या घराबाहेरील ‘ती’ पांढरी इनोव्हा मुंबई पोलिसांची; सूत्रांची माहिती

Mumbai Police - White Innova - Mukesh Ambani House - Maharashtra Today

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुप्तवार्ता विभागाच्या असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली. सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी स्वत:च राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना या इनोव्हा कारबद्दल माहिती दिली. त्यानंतर एनआयएने ही कार ताब्यात घेऊन कार्यालयात आणली.

तसेच ही इनोव्हा कार गुप्तवार्ता विभागाच्या आणखी काही अधिकाऱ्यांनीही वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांची एनआयएने (NIA) रविवारी सकाळी चौकशी करण्यात आली. यावेळी ही माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय, अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती, ती स्कॉर्पिओ कारही पोलिसांचीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हीच स्कॉर्पिओ गाडी अन्वय नाईक प्रकरणातील आरोपी अर्णव गोस्वामी यांना अटक करताना वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. त्यावेळी या गाडीवर बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती. या नव्या माहितीमुळे आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरण आणि अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणातील संशयाचे धुके आणखी वाढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER