‘ममतादीदींच्या विजयाला कमी लेखण्याचा प्रकार म्हणजे क्षुद्रपणा’, पवारांचा भाजपला टोला

Maharashtra Today

मुंबई :- संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेरसने धुव्वा उडवला. तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ताशिखर गाठले. राज्यामध्ये पक्षाला विजय मिळवून देणाऱ्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तृणमूलचे बंडखोर नेते व भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममतांना एक हजार ७३६ मतांनी पराभूत केलं. यावरुन भाजपने ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं जात आहे. आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत भाजपला (BJP) टोला लगावला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की बंगाल मतदारांनी ममता बॅनर्जी यांना जोरदार पाठिंबा दर्शविला आणि तिसर्‍या टर्मसाठी त्यांना निवडले. ते म्हणाले की हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारला हवा, परंतु ज्या प्रकारे त्याच्या विजयाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यालाच संकुचित विचारसरणी, क्षुद्रपणा म्हणता येईल. शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले, ‘ममता बॅनर्जी! आपल्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन. आम्ही लोकांच्या हितासाठी आणि कोरोनाविरोधात एकत्रित काम करत राहू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button