गंगेचे पाणी पिण्यायोग्य नाही

अलाहाबाद: देशात सर्वात पवित्र मानल्या जाणाºया गंगा नदीचे पाणी (river Ganga)पिण्यायोग्य राहिलेले नाही, असे उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलाहाबाद उच्च न्यायालयास (Allahabad High Court)कळविले आहे.

गंगा नदी स्वच्छ करण्याचा विषय न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका म्हणून हाती घेतला असून गेली १५ वर्षे त्यात वेळोवेळी आदेश दिले जात आहेत. गंगा आणि यमूना या नद्यांची अवस्था पूर्वीपेक्षा अधिक खराब झाली आहे, असे निदर्शनास आणणारा एक अर्ज  वकिलांने केला होता. त्यावर न्यायालयाने  राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळास अहवाल सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार मंडळाने जो अहवाल सादर केला त्यात गंगेचे पाणी पिण्यायोग्य नाही. ते फक्त आंघोळीसाठी वापरण्यायोग्य आहे, असे नमूद केले गेले.

न्ययालयाने या प्रकरणात नेमलेल्या ‘अ‍ॅमायकस क्युरी’ने असा आरोप केला की, यापूर्वी आदेश दिलेले असूनही अद्यापही अनेक नाल्यांमधून प्रक्रिया केलेले सांडणाणी थेट नदीत सोड़ले जात आहे. जेथे सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे बसविलेली आहेत त्यांची क्षमता कमी असल्याने किंवा ती नादुरुस्त असल्याने सांडपाणी प्रक्रिया न होताच औसांडून वाहत जाऊन नदीत मिसळते. सरकारने याचा इन्कार केल्यावर आता दोन्ही पक्षांच्या वकिलांनी प्रत्यक्ष जागेवरून जाऊन पाहणी करण्याचे ठरले.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER