कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग अन्य ठिकाणांचे का नाही? – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि उपनगरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांची झोप उडाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी भरलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत २५४ वॉटरपंपद्वारे पाणी उपसा सुरु आहे, अशी माहिती आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. मात्र काही ठिकाणी अद्यापही पाणी तुंबलेले असून भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महापालिकेला लक्ष्य केले आहे.

हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही? ११६% नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबई,करांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

तसेच पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका? नुसते फिरुन उपयोग काय?

ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा? असा प्रश्नही त्यांनी महापालिकेला विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER