वॉश्गिंटन पोस्टच्या फेक न्यूजमुळं इराक आणि इराण युद्धात २० लाख लोकांचा बळी गेला होता

Maharashtra Today

अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट'(The Washington Post) या प्रसिद्ध वर्तमान पत्रात १६ जुलै १९७९ एक खबर छापून आलीय. यामुळं इराक आणि इराण या शेजारील राष्ट्रात तणाव वाढयला लागला. तो इतका वाढला की दोन्ही राष्ट्र एकमेकांविरुद्ध युद्धाला उभी राहिली. हे युद्ध सलग आठ वर्षे सुरु होतं. इतिहासातल्या सर्वाधिक काळ चाललेल्या युद्धांपैकी ते एक युद्ध होतं. या युद्धात दोन्ही राष्ट्रातील लाखो निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. इतक होऊन देखील हे युद्ध एखाद्या क्रिकेट मॅच सारखं अनिर्णित राहिलं.
या युद्धाच्या सुरुवातीला व्यापार हित बघत अनेक राष्ट्रांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. नंतर या आगाची ठिणगी त्यांच्यावर पडली. म्हणून युद्धविरामासाठी त्यांनी प्रयत्नाला सुरुवात केली. या युद्धाच्या परिणामांचा विचार करण्याआधी युद्धाच्या व्यापकतेबद्दल तुम्ही जाणलं पाहिजे. युद्धाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत अनेक विस्मयकारक घटना घडल्या. युद्धाला अनेक कांगोरे होते.

एका बातमीमुळं पेटलं युद्ध

इराण आणि इराक यांची ओळख मित्र राष्ट्रांची होती. मतभेद असले तरी ते टोकाचे नव्हते. सगळं सुरळीत होतं पण अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकात बातमी छापून आली. तो दिवस होता १६ जुलै १९७९ चा. याच वर्षी सद्दाम हुसेन (Saddam Hussein)यांनी इराकचं राष्ट्राध्यक्षपद मिळवलं. ते सुन्नी समुदायातून होते. इराकमध्ये मुस्लीममधील प्रमुख दोन पंथ शिया आणि सुन्नी यांची लोकसंख्या ६०-४० प्रमाणात आहे. वेळ बदलत होती. बदलाचे वारे इराकमध्ये देखील वहायला लागले होते. इराणमध्ये मुस्लीम क्रांती शेवटच्या टप्प्यात होती. आयातुल्ला खैमानी इराणमध्ये सर्वात शक्तीशाली नेत्याच्या रुपात जगासमोर आले होते.

याच काळात त्यांनी एक विधान केलं. सर्व मुस्लीम राष्ट्रांमध्ये इराणसारखी क्रांती झाली पाहिजे. सद्दाम हुसेन यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की शिया समुदायानं सत्तेवर पुन्हा कब्जा केला पाहिजे. त्यांना इराकमध्ये ही क्रांती झालेली पहायची होती. तेव्हाच वॉशिंग्टन पोस्ट दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली. इराण- इराक सीमेवरील ‘शत- अल-अरब’ या जागेत तेलाचा मोठा साठा उपलब्ध होऊ शकतो. अमेरिकेच्या उपग्रहाद्वारे हा दावा करण्यात आला होता. त्यामुळं दोन्ही देशांना ही बातमी खातरीदायक वाटली.

या ठिकाणावर दोन्ही राष्ट्रांनी आपला हक्क सांगायला सुरुवात केली. मध्यस्थी आणि चर्चेतून मार्ग निघाला नाही. प्रकरण संयुक्त राष्ट्रापर्यंत पोहचलं. तेव्हा अमेरिकेने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. प्रकरण बिघडलं. दोन्ही देशात वादाला सुरुवात झाली.

युद्धाची सुरुवात

सद्दाम हुसेन यांना आयातुल्ला खान याच्या विवादीत विधानाचा वापर करण्याची संधी मिळाली. शिय्याविरुद्ध सुन्नी वाद पेटवणाऱ्या आयातुल्लांवर कारवाईची संधी त्यांना इराकमध्ये क्रांती घडवून बदलायची होती. सद्दाम हुसेन यांनी इराणच्या खुजस्तानच्या अधिकांश भागावर त्यांनी कब्जा करण्यासाठी अरबांना भडकवायला सुरुवात केली. या भागात अधिकांश अरबी लोक राहत असतं. यावर इराकचा ताबा बरोबर नाही. अरबांनी हे क्षेत्र ताब्यात घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. ही क्षेत्र इराक आणि इराण दोन्ही राष्ट्रांमधील आयात निर्यात होत होती. यासंबंधी करारही झाले होते.

२२ सप्टेंबर १९८०ला इराकनं इराणवर हल्ला केला. युद्धाला सुरुवात झाली. हवाई हल्ल्या सर्वात आधी करण्यात आला होता. इराकी सैन्यानं इराणमध्ये घुसुन मोठं क्षेत्र ताब्यात घेतलं. इराणी क्रांतीमुळं त्यांच सैन्य कमजोर पडलं होतं. इराकला याचा भरपूर फायदा झाला.

इराणचं सामर्थ्य वाढलं

आयातुल्ला खान यांनी सद्दाम हुसेनविरुद्ध लढण्यासाठी जनतेच समर्थन मिळवलं. इराणची लोकसंख्या इराणपेक्षा बरीच मोठी होती. सद्दामकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं, दारु गोळा होता तर आयातुल्ला यांच्याकडं जनतेचा विश्वास इराणनं मोठ्ठ सैन्य उभारलं ते इराकी सैन्याला मागे ढकलण्याचे प्रयत्न करत होते. सुरुवातीच्या काळात इराकला अमेरिका आणि सोव्हियत संघ दोघांचा पाठींबा होता. इराणच्या क्रांतीवर अमेरिका आधीपासून नाराज होती. इराक शितयुद्धात अमेरिकेच्या समर्थनात होतं. पण अनेक इस्लामिक देशांनी इराणला समर्थन दिलं. यामुळं अचानक इराणची ताकद वाढली. इराकी सैन्याला मागं हटावं लागणार अशी चिन्ह दिसू लागली.
या युद्धात पहिल्या महायुद्धाची छवी दिसत होती. भयानक नरसंहास सुरु होता. इराण दिवसेंदिवस शक्तीशाल होत चालला होता.

तेलाची निर्यात बंद झाली

१९८४ साली युद्ध निर्णायक टप्प्यावर होतं. इराकनं इराणच्या तेल टँकरांवर बॉम्बहल्ले केले. या उत्तरात इराणनं फारस खाडीच्या ‘स्ट्रेट ऑफ होरमुज’ चे सर्व रस्ते बंद केले. इथून जगभरातलं ४० टक्के तेल निर्यात होतं. इराकप्रमाणं इराण बॉम्बफेक करु शकत नव्हतं पण फारस खाडीवरील त्याच्या कब्ज्यामुळं इराकची आर्थिक स्थिती त्यांनी कमजोर केली. यामुळं अनेक राष्ट्रांना याचा फटका बसला.

आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात झाली आणि प्रेक्षकांच्या भूमिकेत असणाऱ्या इतर राष्ट्रांनी क्षणार्धात हा मुद्दा आंतरराष्ट्रीय करुन टाकला. युद्ध रोखलं जावं ही मागणी जोर धरु लागली. दोन्ही राष्ट्रांची आर्थिक स्थिती ढासळली आता ही राष्ट्र हत्यार खरेदी करु शकत नव्हती. त्या मोठ्या राष्ट्रांचं नुकसानही सुरु झालं, ज्यांच्याकडून इराक आणि इराण हत्यार खरेदी करत होतं. आता युद्धबंदी शिवाय पर्यंय नव्हतं.

युद्धबंदी

आर्थिक फायदा होत नसल्याचं पाहून अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघानं हस्तक्षेपाला सुरुवात केली. दोन्ही राष्ट्रांवर मोठा आंतराराष्ट्रीय दबाव टाकण्यात आला. जुलै १९८८ साली युद्ध बंद झालं पण यात २० लाखहून अधिक जणांचा बळी गेला. सैन्यासोबत अनेक निष्पाप नागरिक ही होते.

विशेष म्हणजे वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीमुळं ही परिस्थीती निर्माण झाली होती त्या बातमीचा दावा फोल ठरला. तिथून तेल निघालचं नाही. याच बातमीमुळं अनेक दिवस युद्ध लांबलं होतं. इराकनं वाशिंग्टन पोस्टवर केस ठोकली; पण फक्त माफीमागून वॉशिंग्टन पोस्ट यातून बाहेर पडलं. या युद्धामुळं इराण आणि इराक दोन्ही राष्ट्र पुरती बर्बाद झाली. एखाद्या क्रिकेट मॅच प्रमाणं हे युद्ध ‘टाय’ झालं. आठ वर्षाच्या रणकंदनानंतरही दोन्ही राष्ट्रांच्या हाती फक्त राख आली होती.

या युद्धात लहानांपासून मोठ्यांपर्यंत निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. यातून अनेक राष्ट्रांनी धडा घेतला. आधुनिक युगात व्यापारिक हितांसाठी खेळल्या जाणाऱ्या या रक्ताच्या होळीचा परिचय हे युद्ध आजही देतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button