महाविकास आघाडीची भींत ढासळणार! ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद?

Uddhav Thackeray - Sonia Gandhi

मुंबई :- राज्यातील महत्त्वाचे काँग्रेसचे (Congress) नेते सरकारमध्ये असतानाही काँग्रेसला महाराष्ट्राच्या प्रश्नावर दिल्लीत पत्रकार परिषद घ्यावी लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून या निमित्ताने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

तर, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेनेत (Shiv Sena) कम्युनिकेशन गॅप निर्माण झाला आहे. हा गॅप भरून काढण्यासाठीही काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पक्षात संवाद कायम राहतानाच ठाकरे सरकारवर दबावही राहिला पाहिजे ही हायकमांडची खेली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे सरकारवर काँग्रेसचाही दबाव राहणार असून सरकार चालवताना ठाकरे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : भाजपचा अपेक्षाभंग : भाजपच इनकमिंग रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यश

याला अनेक कारणं आहेत. त्यातीलच प्रमुख कारणे म्हणजे, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शिवसेनेसोबत आघाडी केल्याचा फटका बसला आहे. शिवसेनेसोबत आघाडी केल्याने बिहारमध्ये ओबीसींनी काँग्रेसला मतदान केलं नाही. ओबीसींनी काँग्रेसऐवजी भाजपच्या पारड्यात मतदान टाकलं. त्यामुळे ओबीसींना परत आपल्याकडे आणण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. बिहारची पुनरावृत्ती पश्चिम बंगला, पंजाब आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात होऊ नये म्हणून विरोधी विचाराच्या पक्षासोबत राहूनही विकासकामे करता येतात हे दाखवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे.

दुसरे म्हणजे, काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वावरून वाद सुरू आहे. पक्षातील नेतेच राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य करण्यास तयार नाहीत. इतर प्रादेशिक पक्षही राहुल यांचं नेतृत्व स्वीकारतील की नाही यात शंका आहे. त्यातच यूपीएचे चेअरमनपद शरद पवार यांच्याकडे जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यासाठी शिवसेनेने जोरदार बॅटिंगही केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सोनिया गांधी नाराज असल्याचं बोललं जात आहे.

तिसरे महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील ठाकरे सरकार शरद पवार यांच्या कलाने चालत असल्याचं चित्रं आहे. काँग्रेसला गृहित धरून अनेक निर्णय होत आहेत. त्याबाबत राज्य काँग्रेसने अनेकदा नाराजीही बोलून दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेसचा निर्णय प्रक्रियेत सहभाग व्हावा म्हणूनही काँग्रेसने दबावतंत्र सुरू केल्याचंही राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER