जगाची डोकेदुखी बनलेल्या ‘व्हायरसनं’ भारतीयांसाठी संधी निर्माण केली !

Computer system

बदल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बदलाची प्रक्रिया रोखणं निव्वळ अशक्य. आणि वेळेसोबत घडणाऱ्या घटना ही. अशीच जगभरात भुकंप घडवणारी घटना घडली होती. संपूर्ण जगभरातील संगणक यंत्रणा कोलमडायला आल्या होत्या. हा तेव्हाचा काळ आहे जेव्हा जग २० व्या शतकातून २१ व्या शतकात प्रवेश करत होतं. नव्या शतकात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या मनात निखळ आनंद होता. परंतू अचानक त्यांचा आनंद हिरावून घेतला एका गोष्टीनं.

कारण होतं ‘वाय २ के’ नावाचा बग. बग म्हणजे संगणक प्रणालीत अडचण आणणारा इंटरनेटवरील घटक. जो पर्यंत हा बग शिल्लक होता तोपर्यंत वर्ष आणि शतक उलटलं पण संगणक २० व्या शतकातच होते. जगभरातल्या संगणाची समस्या सोडवतं २१ व्या शतकात संगणाकाला आणण्याचं श्रेय भारतीय कॉम्प्युटर इंजिनिअर्सना जातं. यासाठी अभियंत्यांनी अथख परिश्रम घेतले होते.

कारण होतं की वर्ष १९९९ संपूण तारिख आणि महिना बदलत संगणकांमध्ये २००० वर्षाची सुरुवात व्हायला हवी होती परंतू ३१ डिसेंबर १९९९नंतर २००० वर्ष प्रदर्शित व्हायचं नाही पुन्हा तारिख यायची ०१/ ०१/ १९००. म्हणजे थेट १०० वर्ष मागं संगणाकातली दिनदर्शिका जायची. या बगला ‘मिलेनियम बग’देखील म्हणलं जायचं. कॉम्प्युटरच्या कोडींगमधली ही एक खराबी होती.

अमेरिका आणि युरोपात हाहाकार

अमेरिका आणि युरोपातील संगणक आधारीत व्यवस्थेला याचा मोठा फटका बसला. त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरु होते. अमेरिका तंत्रज्ञानात जगाच्या इतकी वर्ष पुढं असतानासुद्धा त्यांना हे कोडं सोडवायचं तर कसं हेच कळत नव्हतं, संगणकात २१ व्या शतकाच्या तोडीचे प्रोग्रम नसल्यामुळं ही अडचण होत असल्याचं काही जण म्हणत होते. तारखेचा इतका मोठा घोळ झाल्यामुळं न बँकांना काम करणं शक्य होतं न सराकरी कार्यालयं काम करु शकत होती. पावर ग्रिड फेल झाले होते. त्यावर अवलंबलेल्या सर्व सेवा जशा की रेल्वे, पाणी यांची पुर्तता इत्यादी डिवायसेस फेल झाली होती. लिफ्ट, उपग्रह आणि प्रिंटरपर्यंत सर्व यंत्रणा बंद होत्या.

विक्री आणि उत्पादन होत नसल्यामुळं व्यवसायावर त्याचा वाईट परिणाम दिसून आला. ए.टी.एम. आणि बँका वाईट पद्धीनं फेल झाल्या. अर्थव्यवस्थेचा चुराडा झाला. संगणकांशी जोडलेल्या सर्व अस्थापना अकार्यक्षम बनल्या. बँक आणि दवाखान्यातला डेटा ठेवणं सुद्धा अशक्य झालं.

भारताकडं वळालं जग

दिवसेंदिवस परिस्थीती गंभीर होत चालली होती. युरोप आणि अमेरिकेत भीषण चित्र निर्माण झालं. सर्वच संगणकांना अचूक तारिख दाखवणाऱ्या यंत्रणेची गरज भासत होती. वेळेसोबत स्वतः त्याच्यात बदल घडत जातील. यासाठई संगणकांच्या रचनेत मुलभूत बदल करण्याची गरज होती. यासाठी मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर इंजिनिअर्सची गरज होती. त्यावेळी भारतात इन्फोसिस, विप्रोसारख्या तगड्या मोठ्या कंपन्या होत्या. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ होतं. त्यांच्याकडे प्रतिभेच भंडार होतं. शिवाय जगाच्या तुलनेत स्वस्त श्रमशक्ती आणि प्रतिभावंत लोकांचे हात या कामाला लागणार होते.

हा बग ठिक करण्यासाठी बराच पैसा खर्च करण्यात आला. ही समस्या सुधवण्यासाठी काहींनी जवळपास ५ वर्षांमध्ये २०० ते ३०० बिलीयन डॉलर खर्च केले. २ बग्ज ठिक करण्यासाठी जगभरात ६०० के १६०० बिलियन युएस डॉलर खर्च झाले.

भारत आय.टी. जगातला महाशक्ती बनला

भारतीय टेक कंपन्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य वाटू लागली. १९९९ पासून भारतानं जगाला आय.टी. मधील सेवा द्यायला सुरुवात केली. २०१० पर्यंत या क्षेत्रातली महासत्ता बनला. त्यावेळी कंपन्यांच्या एकूण उत्पनातलं ४० टक्के उत्पन्ना हा बग्ज सुधारण्यासाठीच्या कामातून यायचा. भारतीय इंजिनिअर्ससाठी ही समस्या संधी ठरली आज अमेरिकेत १५ लाख भारतीय आय.टी. इंजिनिअर्स काम करतात त्याची सुरुवात या कामापासून झाली असल्याचं मनालं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button