तीन महिन्यात सुरू होणार पुण्याचे विधानभवन

Vidhan Bhavan-Nilam Gorhe

पुणे :- पुण्याचे विधानभवन तीन महिन्यात सुरू होणार आहे. याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजांना होईल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. डॉ. गोऱहे म्हणाल्या की, मुंबईनंतर नागपूर येथील विधानभवन सुरू करण्यात आले. पूर्वी येथे हंगामी कामकाज पाहिले जात होते. आता ते बारा महिने सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे विधानभवन (Vidhan Bhavan) सुरू करण्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत असला तरी धोका मात्र टळला नाही. लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. कोरोना काळात आरोग्य व्यवस्था सांभाळताना केंद्र व राज्य सरकारने जनतेला योग्यप्रकारे धान्य पुरवठा केला. कोरोना परिस्थतीत ऑनलाइन व्यवसायांना चालना मिळाली आहे. फळप्रक्रिया उद्योगांनाही सुगीचे दिवस आले आहेत. राज्याच्या मोठय़ा प्रश्नांबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्नही मुख्यमंत्री लक्ष देऊन सोडवत आहेत. ठाकरे सरकारने महाबळेश्वर येथील वेण्णालेक व बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केला. एका वर्षात महाबळेश्वर शहराचा कायापालट झालेला सर्वांना दिसेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

बिझनेस ऍडव्हायजरीची मुख्य बैठक लवकरच

१ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत राज्याच्या बिझनेस ऍडव्हायजरीची मुख्य बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन्ही सदनांतील विरोधी पक्षनेते, आघाडी सरकारमधील प्रमुख पक्षांचे गटनेते उपस्थित राहतील. बजेटबाबत महत्त्वाचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले जातील. एकंदरीत कामकाजाचे स्वरूप या बैठकीत निश्चित होईल, अशी माहितीही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER