केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर्स उत्तम- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

परभणी :- आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी परभणीतील रुग्णालयांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, पीएम केअर फंडातून मिळालेले सर्व व्हेंटिलेटर उत्तम प्रकारे काम करत आहेत. याच व्हेंटिलेटरवर रुग्णांना उपचार दिला जात आहे. औरंगाबादमध्ये एका कंपनीच्या व्हेंटिलेटरचा प्रॉब्लेम झाला, बाकी तिथले पूर्वीचे व्हेंटिलेटरही चालू आहेत. परंतु इथे कोणताही अडथळा आढळला नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित केले आहे. आम्ही ही मागणी अनेक दिवसांपासून केली होती. पंरतु ५० लाख रुग्णसंख्या झाल्यानंतर राज्य सरकारने घोषणा केली, असेही फडणवीस म्हणाले.

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता; परंतु आता तो १० टक्क्यांवर आला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होतोय हे समाधानकारक आहे. परंतु ५ टक्क्यांच्या खाली आला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः तीन महिन्यांच्या कालावधीत ४० हजार रुग्णवाढ झाली होती. प्रशासनानं आणि डॉक्टरांनी दिवसरात्र मेहनत केली. आपल्याला तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी तयारी करणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यासोबत कोरोना लसीकरणही महत्त्वाचे आहे. तसेच म्यूकरमायकोसिसचे ट्रॅकिंग करणे आवश्यक आहे. त्याचे ट्रॅकिंग केले तर म्यूकरमायकोसिस प्रतिबंधित करू शकू, असे मत देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केले आहे.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या मानहानी याचिकेवर कोर्टाने ‘त्या’ दोन वकिलांना नोटीस बजावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button