लस सर्वानांच मोफत की दारिद्र्य रेषेखालील लोकांना द्यावी; राजेश टोपेंचे प्रश्नचिन्ह उपस्थित

Rajesh Tope

मुंबई :- कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. येत्या काही दिवसात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरण पुरवठा हे एक मोठे आव्हान उभे राहणार आहे. सिरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्र दिले आहे. अद्यापही त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. सोबतच १ तारखेच्या लसीकरणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे.

“राज्यात १ मेपासून लसीकरण सुरू करण्याचे नियोजन आहे. लसीकरण करण्यासाठी सरकार तयार आहे. यासाठी ७ हजार कोटींची लस लागणार आहे. लस सर्वांना मोफत द्यायची की दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत द्यावा, याचा अहवाल कॅबिनेटला दिला आहे, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याबद्दल निर्णय जाहीर करतील.” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनेबद्दल दिली.

“जे एस डब्ल्यू यांनी १०० बेड ऑक्सिजन बेड कार्यवाही सुरू केली. ऑक्सिजनचे जागतिक टेंडर काढण्यात आले आहे. ऑक्सिजन काँट्रक्टमध्ये १३२ पीएसए प्लांट २७ ऑक्सिजन टॅंक, २५ हजार लिटर ऑक्सिजन आणि १० लाख रेमडेसिवीर असणार आहे.” अशीदेखील माहिती टोपे यांनी दिली.

५ लाख ३४ हजार लसीकरण केले आहे, साठा असेल तर महाराष्ट्रात एक दिवसांत ८ लाख लसीकरण करू शकतो. आज पर्यंत दीड कोटी लोकांचे लसीकरण केले. त्यामुळे देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर किती मिळाले हे जाहीर करणार. ऑक्सिजन कसा वापर करावा यांची SOP आज सर्व जिल्ह्यातील सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना देणार आहे. प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन नर्सरी स्थापना केली जाईल आणि ऑक्सिजनचा पर्यायी साठा ठेवला जाईल, यासाठी सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट केले जाईल. जर गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरले तर कारवाई केली जाईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button