लसीचा मुलांवर साइड इफेक्ट नाही; फायझर बायोटेकचा दावा

Maharashtra Today

दिल्ली :- कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने (Pfizer Biotech) दावा केला आहे की, त्यांची लस १२ ते १५ वर्षांच्या मुलांवर १००% परिणामकारक आहे. CNN ने सांगितल्यानुसार, अमेरिकेत २ हजार २५० मुलांवर झालेल्या फेज-३ ट्रायल्समध्हे ही लस १००% परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या महिनाभरात त्यांच्या शरीरात अँटीबॉडीचा चांगला रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.

व्हॅक्सीनचे ट्रायल्स ऑक्टोबर २०२०मध्ये सुरू झाले होते. या लसीकरणादरम्यान भारतीय वंशाचा १२ वर्षीय अभिनवने फायजरची लस घेतली होती. तो कोरोना व्हॅक्सीन घेणाऱ्या सर्वात कमी वयांच्या मुलांमध्ये सामील आहे. त्याचे वडील शरत डॉक्टर असून, कोव्हिड व्हॅक्सीनच्या ट्रायल्समध्ये सामील होते. अभिनवने अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये लस घेतली.

या कंपनीने मागच्या महिन्यात ६ महीन्यांपासून ११ वर्षापर्यंतच्या मुलांना लस घेण्यासाठी फेज – १,२,३ च्या क्लिनिकल ट्रायलचा अभ्यास सुरू केला आहे. यादरम्यान, ५ ते ११ वर्षांच्या मुलांना पहिला डोस देण्यात आला. कंपनी पुढच्या आठवड्यापासून २ ते ५ वर्षांच्या मुलांना लस देण्याच्या तयारीत आहे.

ही बातमी पण वाचा : हायकोर्टातील न्यायाधीश, वकिलांना कोरोनोची लस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button