विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर!

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला लोखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात. मागच्या वर्षी याच दिवशी दोन गटांमध्ये वाद होवून दंगल घडून आली होती. मात्र, यंदा असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता म्हणून विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यादिवशी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साह्याने ठेवणार लक्ष असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगीतले आहे.

१ जानेवारी रोजी परिसरातील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया नागरिकांसाठी ११ ठिकाणी पार्किंग व इतर भौतिक सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेची हमी प्रशासनावर असतानाच संपूर्ण गर्दीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही, असा निश्चय जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी केला आहे. आणि त्यादृष्टीने येथे उपाययोजना करण्यात येत आहे. यासोबतच या परिसराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी साांगितले.

मानवंदनेसाठी येणाºया बांधवासांठी ११ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, बसने अंतर्गत वाहतूक, १५० पाण्याचे टँकर, १० किलोमीटर अंतरावरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेºयांसह ड्रोन कॅमेºयानेही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासोबतच अग्निशमन, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत कोणत्याही फलकात वादग्रस्त मजकूर आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसंच सोशल मिडीयावर आलेल्या प्रक्षोभक मजकुरांवर विश्वास न ठेवता पोलीसांना माहिती द्यावी असे जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी सांगीतले आहे.

त्याचप्रमाणे, १ व २ जानेवारीला झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानीत ७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून ६ कोटींपेक्षा जास्त नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. याबरोबरच आणखी मदत देणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच

या वर्षी कोरेगावात सर्वाधिक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रशासनाने चांगली तयारी केली असून, पोलीस प्रशासनाला स्थानिक मदतीसाठी गावात शांतिदूत तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.