अमेरिका चीनच्या ३३ कंपन्या ‘ब्लॅक लिस्ट’ करणार

Donald Trump

वॉशिंग्टन : अमेरिका चीनच्या ३३ कंपन्या व इतर आणि काही संस्थांना ‘इकॉनॉमिक ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकणार आहे, अशी माहिती अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटने दिली आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, चीनने जगात कोरोनाची साथ मुद्दाम पसरू दिली, असा अमेरिकेचा आरोप असून यावरून दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

अमेरिकेची ही कारवाई चीनला मोठा आर्थिक धक्का मानली जाते आहे. अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की, या कंपन्यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केले असून या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. चीनला धडा शिकवायला हवा या हेतूने अमेरिका मोठी पावले उचलते आहे. अमेरिकेत कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. ९६ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER