पवारांच्या आधीच पडळकरांच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण

Ahilyabai Holkar Statue - Sharad Pawar

पुणे : जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा (Ahilyabai Holkar) पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा (Corona) काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडलं होतं. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र पवारांच्या आधीच अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलेलं असून, भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींनी बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी काम केलं होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं पडळकरांनी पुतळ्याचं अनावरण केलं. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER