केंद्राच्या कृषी कायद्यांचे अमेरिकेने केले स्वागत

- मतभेद चर्चेतून दूर होऊ शकतात

Farmers Protest - Joe Biden

वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) भारताच्या (India) नवीन कृषी कायद्यांचे (Agricultural Law) स्वागत केले आहे. नव्या कृषी कयद्यामुळे भारताचा जगातील बाजारावर प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. असे अमेरिकेने म्हटले आहे.

या कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाबाबत अमेरिकेने म्हटले आहे की, शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हे भरभराट होणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात. भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या या कायद्यांचे स्वागत आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, बायडेन सरकार कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या निर्णयाचे समर्थन करते. नवीन कृषी कायदे खासगी गुंतवणुकीस आकर्षित करतात आणि शेतकर्‍यांसाठी अधिकाधिक बाजारपेठांना आकर्षित करू शकतात. अमेरिकेने भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भारतातील शेतकर्‍यांच्या आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, अमेरिका भारतातील पक्षांतर्गत मतभेदांचे निराकरण करण्याच्या बाजूने आहे. शांततेत निषेध करणे ही कोणत्याही लोकाशाहीच्या भरभराटीची वैशिष्ट्य आहे आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) असे म्हटले आहे.

अनेक नेत्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अमेरिकेतील नवे बायडन (Joe Biden) सरकार या कायद्यांबाबत भारत सरकारला पाठिंबा देत असताना अनेक अमेरिकन भारतातील शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत आहेत. अमेरिकन कॉंग्रेसचे हेली स्टीव्हन्स म्हणाल्या की, नवीन कृषी कायद्यांविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणार्‍यांविरूद्ध कारवाई केल्याबद्दल मला काळजी वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER