जगातला पहिला व्हायरस बनवण्यात या दोघा पाकिस्तानी भावांचा ‘ब्रेन’ होता

Maharashtra Today

कॉम्यप्यूटर वापरणाऱ्यांसाठी व्हायरस सर्वात मोठी डोकेदुखी असतो. आजच्या डिजीटल युगात एक किरकोळ व्हायरस बऱ्याच काही गोष्टी बिघाडू शकतो. रोज वेगवेगळ्या व्हारसबद्दल काही न काही आपल्या कानावर येतचं असतं पण या व्हायरस नावाच्या प्रकाराची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहितीये का?

चला तर मग जाणून घेवू या पाकिस्तानात राहणाऱ्या त्या दोन भावांनी(Pakistani brothers) कसे बनवले होते कॉम्प्यूटर व्हायरस (Computer virus).

सॉफ्टवेअर बनवण्याचा होता नाद

तारुण्याच्या सुरुवातीला अनेक युवक करिअर कशात आणि काय करायचं याबद्दल चिंतेत असतात, आयुष्याच्या याच वळणावर असणारे पाकिस्तानचे दोन युवक काही वेगळं करुन बघण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा या भावांनी कल्पना देखील नव्हती की त्यांचे हे प्रयोग येणाऱ्या डिजीटील जगामध्ये संकटांच दार उघडेल. याची सुरुवात झाली होती पाकिस्तानची सायबर हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाहोर शहरात. ‘बासिख’ आणि ‘फारुख’ (‘Basikh’ and ‘Farooq’)बंधूंनी नुकताच कॉम्प्यूटरच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. त्यांच्या जवळ स्वतःचा कॉम्प्यूटर नव्हता पण घराशेजारच्या एका नेट कॅफेत दिवसभर कॉम्प्यूटरवर बसून ते कोडींग शिकायचे. बरेच महिने त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी त्यांनी सॉफ्टवेअर बनवण्यात यश मिळवलं. ते लहान सहान उद्योजक, व्यापाऱ्यांसाठी सॉफ्टवेअर बनवून स्वस्त किंमतीत विकू लागले.

डोकं वापरून बनवला ब्रेन व्हायरस

त्यांना वाटलं की बनवलेले सॉफ्टवेअर विकून चांगले पैसे कमावता येतील पण वास्तावत तसं काही झालं नाही. त्यांनी बनवलेले सॉफ्टवेअर लोकांना आवडायचे पण खरेदी करायला ते नकार देत. लोक त्यांच्याकडून टेस्टींगसाठी सॉफ्टवेअर बनवायचे आणि फुकटात इतरांना वाटायचे. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. यातून काय मार्ग काढता येईल यावर ते विचार करु लागले.

दोघांनी रात्रंदिवस एक करुन सॉफ्टवेअर बनवले होते. हे सॉफ्टवेअर फुकट मिळत असतील तर विकत कुणी सॉफ्टवेअर घेणार नाही, याची कल्पना होती. यावर उपाय म्हणून त्यांनी ‘ब्रेन व्हायरस’ची कोडींग सुरु केली. ब्रेन व्हायरसच निर्माण सुरुवातीच्या काळात सॉफ्टवेअर म्हणूनच करण्यात आलं होतं त्यांना अंदाज नव्हता की पुढं जाऊन हे सॉफ्टवेअर व्हायरसच रुप घेईल. त्यांनी बनवलेल्या सॉफ्टवेअर्सना खरेदी न करता जो कुणी बेकायदेशीर मार्गानं सॉफ्टवेअर इन्सटॉल करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या कॉम्प्यूटरमध्ये ब्रेन व्हायरस शिरकाव करत असे.

यानंतर स्क्रिनवर त्यांच्या कंपनीचे नाव, स्टोअरचा फोन नंबर आणि पत्ता दिसायचा. जर इन्सटॉल करणाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधून त्या लोकांनी सॉफ्टवेअर खरेदी केलं तरच ते सॉफ्टवेअर सुरु व्हायचं. यातून दोघांनी चांगले पैसे कमवले. त्यांनी बनवलेल्या प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये ते ब्रेन व्हायरस टाकायचे.

सॉफ्टवेअर बनवायच्या व्यवसायाची सुरुवात जरी लहान स्वरुपात झाली असली तरी हळू हळू व्यवसाय वाढत गेला. विदेशातही सॉफ्टवेअर्स विकली जाऊ लागली. अमेरिका आणि इंग्लंडपर्यंत सॉफ्टवेअर्स पोहचले आणि सोबत ‘ब्रेन व्हायरस’ ही या देशांमध्ये पोहचला. यामुळं अनेकांच्या सिस्टम्स हँग होऊ लागल्या. लायसन्स कॉपी घेतली तरी व्हायरस त्यात रहायचाच. त्यामुळं या दोघा बंधूंना आता धमक्यांचे फोन येऊ लागले. तक्रारी वाढू लागल्या. याआधी व्हायरस नावाची गोष्ट ऐकण्यात नव्हती. ही पहिलीच घटना होती. यानंतर अनेक देश विदेशातली कोडर्सनी एकत्र मिळून काम केलं आणि व्हायरस संपवण्यासाठीचा प्रोग्रॅम बनवला. जगानं पहिल्यांदा व्हारससारखी गोष्ट अनुभवली होती.

या घटनेमुळं बासिख आणि फारुक यांचं नावं मोठ्याप्रमाणात प्रसिद्धीस पावलं. त्यांच्या कंपनीचा मोठा विस्तार झाला. आज ‘ब्रेन नेट’ पाकिस्तानात नेट आणि टेलिकॉमच्या सुविधा देते आहे. बदलत्या काळाचा कल ओळखत दोन्ही भावांनी सॉफ्टवेअर व्यवसायातून इंटनेट व्यवसायात उडी घेतली. पण आजही कॉम्यप्यूटर व्हायरससाठी त्यांना संपुर्ण जग ओळखतं. ब्रेन व्हायरसमुळं जगानं पहिल्यांदा कॉम्यप्यूटर व्हायरस बघितला यावर उपाय योजना झाल्या. आज अँटी व्हायरस व्यवसाय ही या दोघांमुळचं मोठ्या तेजीत सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER