दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही ; विधानसभा अध्यक्षांनी सुनावले

Nana Patole

मुंबई :- सरकारने हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचेच ठेवल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नियमावली तयार करण्यासंदर्भात भूमिका मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही, असे सुनावले. जनतेचे प्रश्न सोडवणे या दोन दिवसात शक्य नाही. इतर राज्यांमध्ये अधिवेशन आठ ते १० दिवसांचे घेण्यात आले आहे. त्यामुळे या पुढचे अधिवेशन नियमित होईल असे नियोजन सरकारने करावे अशी सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी केली आहे राज्यातले प्रश्न अनेक आहेत. आमदारांचे अधिकार आणि जनतेचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. म्हणून सरकारला विनंती विरोधी पक्ष आणि सरकार यांनी बसून नियमावली करा. सोशल डिस्टन्सिंग घेऊन नियमावली तयार करावी. दोन दिवसांचा वेळ अपुरा आहे. पुढचे अधिवेशन नियमित अधिवेशन होईल ही कारवाई केली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांना अधिवेशन आणि कॅबिनेटची बैठक नकोच, नारायण राणेंची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER