‘सामना’च्या बाबतीत २० ऑगस्टला केलेले ट्विट अगदी खरे ठरले – नितेश राणे

Niteshs Rane

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा तपास आता सीबीआयसह (CBI) इतर यंत्रणा करत आहेत. या प्रकरणाच्या तपासावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. यामागे नेपोटीजमसह अनेक बड्या व्यक्तींचा हात असल्याचे वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केली होती.

सीबीआय तपासामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे विरोधकांनी आरोप केला. दरम्यान, सीबीआय चौकशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) लेखातून हे प्रकरण मराठी, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणूस या विषयांशी जोडून केला जाईल असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटद्वारे केला होता.

आता नितेश राणे यांनी यासंदर्भात आणखी एक ट्विट केले असून सद्याची परिस्थिती बघता २० ऑगस्टला केलेले ट्विट आज अगदी खरे ठरत असल्याचे म्हणत शिवसेनेसह खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. “Tweeting again! So true २० ऑगस्टला केलेले ट्विट आज खरे ठरले. आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेख चे विषय : 1.)मराठी अस्मिता 2.)महाराष्ट्र धर्म 3.)मराठी माणूस. Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही.. तेव्हा Dino, Jacqueline, disha पाहिजे असतात.. वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस !” असा निशाणा नितेश राणे यांनी सामनावर साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER