
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचं (UPA) अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शरद पवार हे यूपीएचे अध्यक्षपद स्वीकारतील असं सांगितलं जात आहे. दरम्यान शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाल्यास काय भूमिका असेल यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. नव्या राजकीय परिस्थितीमुळे विरोधकांना एकत्र येऊन काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.
काँग्रेस (Congress) मोठा पक्ष आहे; पण त्याला लोकसभेत विरोधी पक्षाचे पद मिळवता आले नाही हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला एकत्र येऊन यूपीएला मजबूत करावं लागेल. ज्या प्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) झाली त्याच प्रकारे आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय होतील, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी सांगितलं.
ही बातमी पण वाचा : शरद पवार यूपीएचे अध्य़क्ष झाल्यास आनंदच : संजय राऊत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला