ट्विटरवर ‘कोकीनजीवी’ हॅशटॅगचा ट्रेंड

Cocaine Jeevi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत शेतकरी आंदोलकांसाठी ‘आंदोलनजिवी’ या शब्दाचा प्रयोग केला होता. यानंतर या शब्दावरून रोज नवनवीन प्रयोग होताना दिसत आहे. पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel) शंभरी पोहोचल्यानंतर नेटकाऱ्यानी मोदी सरकारवर ‘पेट्रोलजीवी’ हॅशटॅगचा निशाणा साधला आहे. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात #कोकीनजीवी हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्तेत असलेल्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) यांच्यात रोज शाब्दिक चकमक घडताना दिसत आहे. अशातच भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याची महासचिव पामेला गोस्वामी हिला शुक्रवारी कोलकाता पोलिसांनी अटक केली. हिला न्यू अलीपूर भागातून अटक करण्यात आली. पोलिसांना तिच्या गाडीत लाखो रुपयांचे कोकीन ड्रग्सही आढळून आले.

पामेला ही ड्रग्स पुरवठा साखळीचा भाग असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. न्यू अलिपूर रोडवर तिची कार पोलिसांनी अडवली आणि झडती घेतली. कारमध्ये आणि तिच्या बॅगमध्ये १०० ग्राम कोकीनचा साठा आढल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तसेच तिचा जवळचा सहकारी आणि भाजपा नेता प्रबिर कुमार डे यालाही पोलिसांनी अटक केले. दरम्यान, पामेला हिला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर #कोकीनजीवी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER