ट्रॅक्टर रॅलीचे मार्ग बदलले; दोन संघटनांवर कारवाई

Tactor Rally

सोनीपत : दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण आले. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्च्याने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आंदोलनाविरोधात समिती स्थापन करण्यात आली होती. तरीही, समितीने दिलेल्या अहवालात दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी  नियोजित मार्ग बदलला. त्या संघटनांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यावर तपास समिती आयोजित करण्यात आली आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असे अहवालात म्हटले आहे. तपास समितीच्या अहवालानंतर उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये चक्का जाम आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनानंतर कुंडली सीमेवर सायंकाळी ३२ शेतकरी संघटनांपैकी १४ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंजाब किसान युनियनचे रुलदू सिंग मानसा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाच्या यशानंतर पुढील रणनीती आखण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांत चक्का जाम आंदोलन करण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे या दोन राज्यांत आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच रणनीती बदलण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्च्याशी एकदा चर्चा करायला हवी होती, असे राकेश टिकैत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER