‘भीक नको पण कुत्र आवर’ म्हणायची वेळ आली, केंद्र आणि राज्याच्या वादावरुन मनसेचा टोला

Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त आजपासून महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र केंद्राकडून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने मर्यादित लसीकरण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी कालच दिली. तर दुसरीकडे महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा जास्त लसी पुरवल्याचा दावा राज्यातील भाजपचे (BJP)नेते करत आहे. मात्र राज्य आणि केंद्राच्या या आरोपप्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील जनतेची कोंडी होत आहे. आणि याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांसह राज्य आणि केंद्र सरकारला(Center Govt) टोला लगावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत टोला लगावला. जुनी म्हणं आहे ‘भीक नको पण कुत्र आवर’, आता म्हणावंस वाटतंय लस नको पण भांडण आवर. केंद्र आणि राज्याच्या वादामध्ये जनतेचाच चुराडा होतोय. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे?,असा प्रश्न उपस्थित करत देशपांडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

ही बातमी पण वाचा : लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती ; अजितदादांचे केंद्राला खडेबोल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button