
रत्नागिरी : राजापूर शहराजवळच्या कोंढेतड येथील प्राथमिक शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवलेले तीन मुंबईकर रात्री अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र प्रशासनाने त्यांचा शोध घेत त्यांना पुनश्च विलगीकरण कक्षात आणून ठेवले आहे. मात्र या प्रकारामुळे स्थानिकांत समूह संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. मुंबईकर चाकरमान्यांमुळे जिल्ह्याच्या कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच येणारे काही चाकरमानी गैरशिस्त वागत आहेत. त्यामुळे प्रशासनावर ताण पडत आहे. आरोग्य आणि महसूल प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ होत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला