… महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र राहणार नाहीत – उदयनराजे

Udayan Raje Bhosle

सातारा :- महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन पक्ष सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी केली. सातारा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आले असता उदयनराजेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. (udayanraje bhosale slams mahavikas aghadi over Legislative Council election)

ते म्हणालेत, केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सत्ता हस्तगत करणे हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे. ज्यावेळी वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरिता अमिष दाखवले जाते. मात्र ते कधीच एकत्र राहत नाहीत. त्यांचा उद्देश सार्थक झाला की ते सर्व निघून जातात. याला फक्त भाजपा अपवाद आहे. भाजपा विचाराने एकत्र आहे. त्यांना कोणत्याही ताकदीचा वापर करावा लागत नाही. त्यांचे उद्दिष्ट निश्चित असल्यामुळे ते एकसंघ आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळण्याचा दावा उदयनराजे यांनी केला. भाजपा राज्यातील सर्व सहा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये एकोपा आहे. टीमवर्क आहे. त्याचे फळ निश्चितच दिसून येईल, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : … याला भुरटेगिरी म्हणतात; बाळासाहेब थोरातांना अतुल भातखळकरांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER