
मुंबई : कोरोनाचा (Corona) धोका देशात कमी होताना दिसताच आता नवीन कोरोना दस्तक देत आहे. ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. नवीन विषाणूचा धोका लक्षात घेऊन राज्यात सावधगिरी बाळगण्याची गरज असून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दिले. कोरोना विषाणूतील जनुकीय बदल व नव्या प्रकारच्या कोरोनावरील उपचार पद्धतीवर टास्क फोर्सने अभ्यास करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
राज्यातील कोरोनाची स्थिती, ब्रिटनमधील कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व नव्या विषाणूच्या संसर्गाचे आव्हान, त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाच्या तयारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. उन्हाळा-पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवले. आता हिवाळ्यात सर्दी-पडसे, ताप-खोकला असे साथीचे आजार वाढले आहे. हे लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांवरअधिक भर द्यावा. त्यासाठी राज्यात असलेल्या कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला