मुंबईत कोरोनाचा धोका वाढला; आता मंत्रालयात कर्मचाऱ्यांना दिवसाआड बोलावणार

Mantralaya

मुंबई :- मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने काही जिल्ह्यांत लॉकडाऊन तर काही ठिकाणी कडक निर्बंध घातले आहेत. त्यातच आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा (Corona) प्रसार वाढत असल्याचे काहींनी म्हटलेले आहे. त्यामुळे मंत्रालयात कामाची वेळ बदलण्यात आली होती. मंत्रालयात एका शिफ्टऐवजी दोन शिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही मंत्रालयातील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने अखेर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दिवसा आणि रात्रीही मोठी गर्दी होत आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER